Tunisha Sharma Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tunisha Sharma: टुनिशाच्या बॉयफ्रेंडच्या अडचणीत वाढ, शीझान- टुनिशाच्या नातेसंबंधांवर होतेय चर्चा...

वयाच्या २०व्या वर्षी तिने स्वतःचा जीव संपवल्यानं सर्वांसाठीच हा मोठा धक्का होता. सध्या आता या प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.

Chetan Bodke

Tunisha Sharma: सध्या हिंदी टेलिव्हिजनसृष्टी टुनिशा शर्माच्या निधनानं हळहळली आहे. 'सब' टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री टुनिशा शर्माने मालिकेच्या सेटवर आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. वयाच्या २०व्या वर्षी तिने स्वतःचा जीव संपवल्याने सर्वांसाठीच हा मोठा धक्का होता. पण आता या प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करीत आहेत. याच चौकशी दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सेटवर तिने आत्महत्या करताच तिला रुग्णालयात नेतानाच मृत्यू झाला. सध्या पोलिस टुनिशाच्या हत्येचे गुढ शोधण्यासाठी बरेच निश्कर्ष लावत आहे. लवकरच पोलिस तिची हत्या होती की आत्महत्या, याचा शोध लावतील. प्राथमिक तपासात टुनिशा प्रचंड नैराश्यात असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली होती. पण नैराश्यामागील मुख्य कारण मात्र समोर आलेले नाही. आता ती गरोदर असल्याच्याही चर्चांना उधाण आले आहे.

काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, टुनिशा ही शीझान खान या तिच्या मित्रासोबत रिलेशनमध्ये होती. नुकताच काही दिवसांपूर्वी तिचे ब्रेकअपही झाले होते. त्यांच्या नात्यात बराच तणाव होता. तर टुनिशा ही गरोदर असून तिच्या प्रियकराने लग्नाला करण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

आज तिचे मुंबईतील जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. शिवाय तिच्या आत्महत्येबाबत पोलिस कसून तपास करत आहे. आता या पोलिस तपासात काय माहिती समोर येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena SC Case Live : ठाकरेंना धनुष्यबाण अन् 'शिवसेना' नाव परत मिळणार? सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी; शिंदे गटाचे टेन्शन वाढले

Mulshi Pattern 2: प्रविण तरडेंच्या 'मुळशी पॅटर्न 2'ला मुळशीकरांचा विरोध; तालुक्याची बदनामी होत असल्याचा आरोप

Hardik Pandya: हार्दिक पंड्याला पुन्हा गुजरातमध्ये जायचं होतं, पण 'या' एका अटीमुळे संपूर्ण प्लानच फिस्कटला!

Maharashtra News Live Update : वाशिममध्ये कार डिव्हायडरला धडकून अपघात, ४ गंभीर जखमी

Gen Alpha Club : शाळेत रंगला निवडणुकीचा धुरळा अन् मिळाली पहिली 'महिला मुख्यमंत्री', नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT