Sidharth-Kiara: सिद्धार्थ- कियाराची लगीन घाई, पण लग्नाच्या तारखेचं काय?

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी मनीष मल्होत्राच्या घराबाहेर स्पॉट.
Sidharth Malhotra and Kiara Advani
Sidharth Malhotra and Kiara AdvaniInstagram @sidmalhotra

Sidharth-Kiara Wedding Bells: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी डेट करत आहेत. याची हिंट कियाराने 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमादरम्यान दिली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. कियारा आणि सिद्धार्थ पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. यांनी या चर्चांना आता पूर्णविराम लागणार आहे. बॉलिवूडमधील हे कपल काल संध्याकाळी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घराबाहेर स्पॉट झाले आहेत.

कियारा आणि सिद्धार्थ त्यांच्या वेगवेगळ्या गाड्यांमधून मनीष मल्होत्राच्या घरी गेले होते. यावेळी कियाराने व्हाईट क्रॉप टॉप आणि व्हाईट पॅन्ट घातली होती. तर सिद्धार्थ मल्होत्रा ब्लु स्वेटशर्ट आणि व्हाईट पॅन्टमध्ये स्पॉट झाला होता. (Celebrity)

सिद्धार्थ आणि कियाराचे हे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी हे जोडपे त्यांचे लग्नाचे आऊटफिट ठरविण्यासाठी मनीष मल्होत्राच्या घरी गेले असतील असा अंदाज लावत आहेत. तर काहीजण म्हणत आहेत की, दोघेही नवीन वर्षात म्हणजे जानेवारीमध्ये लग्न करणार आहेत. यासाठी कियारा आणि सिद्धार्थ मनीष मल्होत्राच्या घरी गेले आहेत अशी चर्चा आहे. सिद्धार्थ-कियारा यांनी अद्याप त्यांचे नात्याची अधिकृत घोषणा अद्याप केली नाही. पण हिंट मात्र दिली आहे. (Bollywood)

Sidharth Malhotra and Kiara Advani
Video: रुपालीचे क्रिसमसनिमित्त केले चाहत्यांचे मनोरंजन, हूक स्टेप्सने सर्वांचेच लक्ष वेधले...

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले की, 'दोघांचे लग्न 15 जानेवारी 2023 रोजी ओबेरॉय सुखविलास चंदीगड येथे होणार आहे.' तर दुसऱ्याने लिहिले आहे, 'मनीषच्या घरी? कदाचित दोघेही लग्नाचे कपडे फायनल करण्यासाठी गेले असतील?'

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि कियारा यांनी त्यांच्या लग्नाचे ठिकाण ठरवले आहे. त्यांच्या लग्नासाठी त्यांनी पंजाबची राजधानी चंदीगडमधील ओबेरॉय सुखविलास हॉटेलची निवड केली आहे. लग्नानंतर दोघांचे ग्रॅण्ड रिसेप्शन मुंबईत होणार आहे. एवढेच नाही तर मल्होत्रा ​​आणि अडवाणी कुटुंबीयांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. लवकरच लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा केली जाईल असे सुद्धा म्हटले जात आहे.

कियारा आणि सिद्धार्थ यांच्याबाबतीत काही दिवसांपूर्वी एका सूत्राने सांगितले होता की, 'दोघेही पुढील वर्षी एप्रिलमध्ये लग्नबंधनात अडकू शकतात. त्यांच्या खूप जवळचे लोकच लग्न उपस्थित असतील, या लोकांमध्ये फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र सहभागी होतील. यासोबतच या लग्नात बॉलिवूडमधील कोणालाही आमंत्रित केले जाणार नाही कारण हा विवाह दिल्लीचा असणार आहे.

कियारा आणि सिड आधी कोर्ट मॅरेज करणार आहेत आणि नंतर रिसेप्शननंतर कॉकटेल पार्टी करू शकतात. पण लग्नाचे सर्व कार्यक्रम दिल्लीत होणार असल्याने रिसेप्शन पार्टीला सेलिब्रिटींना आमंत्रित केले जाईल की नाही याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सिद्धार्थ आणि कियाराने 2021 मध्ये आलेल्या 'शेरशाह' चित्रपटात एकत्र काम केले होते. सिद्धार्थच्या दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. ही वेब सीरीज Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे. कियारा लवकरच 'सत्यप्रेम की कथा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिका साकारणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com