Raju Shrivastav: राजू श्रीवास्तव पत्नी करणार त्यांचे स्वप्न पूर्ण, राजकारणात करणार प्रवेश

राजू श्रीवास्तव यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय पत्नी शिखा यांनी घेतला आहे.
Raju Srivastava Instagram
Raju Srivastava InstagramInstagram/@rajusrivastavaofficial
Published On

Raju Shrivastav Birth Anniversary: प्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचे यावर्षी २१ सप्टेंबर रोजी निधन झाले. राजू श्रीवास्तव अप्लाय नाहीत यावर आजही विश्वास ठेवणे कठीण जाते. राजू यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्त राजू यांच्या पत्नीने त्यांच्याविषयी खास आठवणी शेअर केल्या आहे.

शिखा श्रीवास्तव यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, राजू यांनी राजकीय क्षेत्रात जायचे होते. तर राजू यांची ही इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय शिखाने घेतला आहे.

Raju Srivastava Instagram
Sidharth-Kiara: सिद्धार्थ- कियाराची लगीन घाई, पण लग्नाच्या तारखेचं काय?

शिखाने सांगितले की, 'शेवटच्या काळात राजू राजकारणात सक्रिय झाले होते. सपानंतर ते भाजपमध्ये दाखल झाले होते आणि त्यांच्यासमोर अनेक योजना होत्या ज्या त्यांच्या मृत्यूने अपूर्ण राहिल्या. मला संधी मिळाली तर कदाचित मी त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. हे कसे होईल आणि काय होईल याची मला कल्पना नाही.' (Politics)

शिखाने सांगितले की, राजू यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे संपूर्ण कुटुंब कानपूरमध्ये आहे. राजू यांच्या स्मरणार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कुटुंबीय या कार्यक्रमात सहभागी होऊन महान विनोदी कलाकाराच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. शिखा म्हणाली की तिथे सर्व काही असेल, फक्त राजू नसतील. (Celebrity)

राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने सर्वांना खूप दुःख झाले. मृत्यूच्या 40 दिवस आधी त्यांना जिम करत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही काळ प्रकृती स्थिर राहिल्यानंतर त्यांच्यामध्ये सुधारणाही दिसून येत होती. मात्र दुर्दैवाने त्यांना वाचवता आले नाही. त्यांच्या निधनाच्या वेळी त्यांचे वय 58 वर्षे होते. राजूच्या जाण्याने विनोदी जगताची मोठी हानी आहे, जी कधीही भरून निघणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com