TMKOC's Asit Modi Accused Saam Tv
मनोरंजन बातम्या

TMKOC's Asit Modi Accused: ‘तारक मेहता’तील अभिनेत्रीने निर्मात्यांवर लावला लैंगिक छळाचा आरोप; सांगितला ‘तो’ किस्सा

मिसेस सोढीच्या भूमिकेत असलेल्या जेनिफर मिस्त्री सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली. यावेळी तिने हैराण करणारा खुलासा केल्यामुळे ती चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

TMKOC's Asit Modi Accused: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या १५ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. या मालिकेचा प्रेक्षकवर्ग देखील फारच मोठा असल्याने नेहमीच ही मालिका प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. मालिकेतील अनेक कलाकार आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यातीलच एक जोडी म्हणजे मि. अँड मिसेस सोढी. मिसेस सोढीच्या भूमिकेत असलेल्या जेनिफर मिस्त्री सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली. यावेळी तिने हैराण करणारा खुलासा केल्यामुळे ती चर्चेत आली आहे.

पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, “जेनिफर मिस्त्रीने गेल्या दोन महिन्यांपासून मालिकेचं शूटिंग थांबवलं होतं. ती शूटिंगसाठी शेवटची ७ मार्चला सेटवर आली होती. सोहेल आणि जतिन बजाजनं अभिनेत्रीचा अपमान केला होता, त्यानंतर ती सेटवरून निघून गेली होती. जेव्हा निर्मात्यांनी अभिनेत्रीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिनं कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.” (Entertainment News)

पण तिने त्यावेळी संवाद साधताना आवर्जुन सांगितले की, “मी आता मालिका सोडली आहे. माझा अखेरचा भाग ६ मार्च रोजी प्रसारित झाला होता. प्रोजेक्ट हेड सोहेल रमानी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जतिन बजाजनं मला अपमानित केलं.”

जेनिफर मिस्त्री संवाद साधताना सांगते, “होळी या सणाच्या दिवशी माझ्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती. तो दिवस होता ७ मार्चचा. आणि त्याचदिवशी माझ्यासोबत ही घटना घडली. मी निर्मात्यांकडे सुट्टीसाठी अनेकदा विचारणा केली होती. पण मला त्यांनी सुट्टी दिली नव्हती. सोहेलनं माझ्या गाडीला जबरदस्तीनं थांबवलं. मी त्यांना म्हणाले, मी १५ वर्ष या मालिकेमध्ये काम केलं आहे, तुम्ही माझ्यासोबत असं वर्तन करू शकत नाहीत. त्यानंतर सोहेलनं मला धमकी दिली. लगेचच मी असित कुमार मोदी, सोहेल रमानी आणि जतिन बजाज विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे.” (Bollywood)

मी आधीच माझ्या टीमला सांगितलं होतं, “माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि मी हाफ डे घेऊन घरी जाणार आहे, माझी मुलगी देखील होळी सेलिब्रेशनसाठी माझी वाट पाहत आहे. पण निर्मात्यांनी मला घरी जाऊ दिलं नाही, मी असं देखील म्हटलं की दोन तासाचा ब्रेक घेऊन मी परत शूटवर येईन. पण निर्मात्यांनी ऐकलं नाही.”

“निर्माते नेहमीच सर्व मेल ॲक्टर्सला प्रत्येक बाबतीत ॲडजस्ट करत असतात. या मालिकेमध्ये पुरुषप्रधान संस्कृती अनेकदा दिसून येते. जतिननं देखील एकदा माझी कार थांबवण्याचा प्रयत्न केला होता. ती सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. ही घटना ७ मार्चची आहे. मला वाटलं होतं, माझ्या मालिकेतील लोकं मला कॉल करतील. पण २४ मार्च रोजी सोहेलनं मला नोटीस पाठवली की, मी मालिका सोडली होती म्हणून ते माझे पैसे कापत आहेत.” (Bollywood Actress)

सोबतच मिसेस सोढी मुलाखतीत पुढे म्हणते, “त्यानंतर, ४ एप्रिलला मी त्यांना व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून उत्तर दिलं, माझं लैंगिक शोषण झालं आहे. मी एक ड्राफ्ट पाठवला आणि त्याचं उत्तर देत ते म्हणाले, मी त्यांच्याविरोधात (निर्मात्यांविरोधात) हे सगळं पैशांसाठी करत असल्याचे म्हणाले.”

“मी तेव्हाच निर्णय घेतला की, आता यांनी माझी सर्वांसमोर माफी मागावी. मी यासाठी वकीलाची मदत घेतली आहे. ८ एप्रिलला मी निर्माते असित मोदी, प्रोजेक्ट हेड सोहल रमानी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जतिन बजाजला नोटीस पाठवली. पाठवलेल्या नोटीशीवर मला त्यावर अद्याप कोणतंच उत्तर मिळालेलं नाही. पण मला विश्वास आहे की, आता माझे वकील या प्रकरणात लक्ष घालतील आणि प्रकरणाचा योग्य तो तपास कायद्याच्या मदतीनं करतील.”

हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालबद्दल सांगायचे तर, ही अभिनेत्री ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये मिसेस सोढीची भूमिका साकरली होती. मध्यंतरी काही वर्षांच्या काळासाठी तिने ही मालिका सोडली होती. आता पुन्हा एकदा या मालिकेत जेनिफर मिस्त्री प्रमुख भूमिकेत परतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT