Manoj Bajpayee Fitness Secret: काय बोलता?, मनोज वायपेयीने १४ वर्ष डिनरच केलं नाही... काय आहे कारण?

Manoj Bajpayee Skips Dinner In Last 14 Years: मनोज वाजपेयी यांनी गेल्या 14 वर्षांपासून रात्रीचे जेवण (डिनर) केले नसल्याचा खुलासा केला आहे.
Manoj Bajpayee's New Movie Bandaa Announced
Manoj Bajpayee's New Movie Bandaa Announced Instagram @bajpayee.manoj

Manoj Bajpayee Interview: अभिनेता मनोज वायपेयी सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा 'बंदा' हा चित्रपट झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. अशात मनोज वाजपेयी यांच्या एका मुलाखतीची जोरदार चर्चा रंगली आहे. मनोज वाजपेयी यांनी गेल्या 14 वर्षांपासून रात्रीचे जेवण (डिनर) केले नसल्याचा खुलासा केला आहे. मनोज रात्री अजिबात खात नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोज वायपेयी असं करतात.

सहसा लोक फिट राहण्यासाठी व्यायाम आणि योगासने करतात, जिमला जातात आणि दिवसातून तीन वेळ जेवतात. पण मनोज वायपेयी यांनी त्यांच्या दिनक्रमातून रात्रीचे जेवण पूर्णपणे काढून टाकले आहे. (Latest Entertainment News)

Manoj Bajpayee's New Movie Bandaa Announced
Adah Sharma Share Video: 'द केरला स्टोरी' फेम अभिनेत्री लागली देवपूजेला; वाढदिवशी केले शिव तांडव पठण

मनोज वायपेयी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनी रात्रीचे जेवण वगळण्याचा निर्णय कसा घेतला आणि यासाठी त्यांनी त्यांच्या आजोबांकडून प्रेरणा घेतली. सुरुवातीच्या काळात त्यांना हा रुटीन फॉलो करणे कठीण गेले.

काही दिवसांपूर्वीच त्यांच्या 'सिर्फ एक बंदा काफी है' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्याने या चित्रपटातून रात्रीचे जेवण वगळण्याबद्दल सांगितले.

किती वर्षे जेवण केले नाही असे विचारले असता मनोज वायपेयी म्हणाले, '१३-१४ वर्षे झाली. मला वाटले की माझे आजोबा खूप बारीक आहेत आणि ते नेहमी खूप फिट असायचे. म्हणून मी विचार केला की ते जे फॉलो करतात ते मी देखील कारेन. मग मी तसे करायला सुरूवात केल्यावर माझे वजन नियंत्रणात राहू लागले. मला पण खूप एनर्जेटिक वाटले. खूप निरोगी वाटू लागले. मग मी ठरवले की आता मी त्याचे पालन करेन.

मनोज वायपेयी पुढे म्हणाले, 'मग त्यात अजून भर म्हणजे मी उपवास करायला सुरुवात केली, कधी 12 तास, कधी 14 तास. मी हळुहळू रात्रीचे जेवण वगळू लागले. दुपारच्या जेवणानंतर आमच्या स्वयंपाकघरात काहीही शिजत नाही. आमची मुलगी हॉस्टेलमधून आल्यावरच यात बदल होतात आणि रात्रीचे डिनर बनते.

मनोज वायपेयी यांनी सांगितले की, सुरुवातीला ही दिनचर्या पाळण्यात अनेक अडचणी आल्या. त्यामुळे भूक भागवण्यासाठी ते भरपूर पाणी प्यायचा आणि बिस्किटं खायचे. मनोज वायपेयी यांच्या म्हणण्यानुसार, या दिनचर्येमुळे त्यांची जीवनशैली खूप बदलली.

यामुळे मनोज वायपेयी यांना ना कोलेस्ट्रॉल आहे ना डायबिटीज आहे, ना हृदयविकाराचा त्रास आहे. मनोज वायपेयीच्या 'सिर्फ एक बंदा काफी है' चित्रपटामध्ये वकीलाची भूमिका साकारत आहे. यामध्ये तो एका स्वयंभू गॉडमॅनशी भिडताना दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com