Bigg Boss 16 Latest Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: रोहित शेट्टीला पाहून टॉप ५ स्पर्धकांचा कल्ला, विकेंडला होणार मोठा राडा...

गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉसमधील सर्व स्पर्धकांना आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. अशातच आणखी एक धक्का आता स्पर्धकांसह प्रेक्षकांना मिळणार आहे.

Chetan Bodke

Bigg Boss 16 Finale Latest Update: गेल्या काही महिन्यांपासून 'बिग बॉस 16' ने प्रेक्षकांना खुर्चीवर चांगलेच खिळवून ठेवले आहे. गेल्या अनेक सीझनप्रमाणे हा सीझनही बराच हिट ठरला. अशातच बिग बॉसच्या फिनालेची चाहत्यांना उत्सुकता पोहोचली आहे. अलीकडेच, त्यांच्या प्रवासाचा व्हिडिओ गेल्या काही भागांमध्ये दाखवण्यात आला, या माध्यमातून सर्वांनाच त्यांच्या प्रवास जाणून घेता आला. गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉसमधील सर्व स्पर्धकांना आश्चर्याचे धक्के मिळत आहेत.

अशातच पुन्हा एक धक्का आता सर्वांना मिळणार आहे. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि खतरों के खिलाडीचा होस्ट रोहित शेट्टी धमाकेदार घरात प्रवेश करताना दाखवण्यात आला आहे. रोहित स्पर्धकांना सरप्राईज देऊन घरात प्रवेश करणार आहे. त्याच्या चित्रपटाप्रमाणेच त्याने धमाकेदार एंट्री बिग बॉसच्या घरात केली आहे. 'बिग बॉसच्या घरातील टॉप 5 स्पर्धक रोहितला भेटण्यासाठी बाहेरच्या परिसरात जमतात. रोहित शेट्टी दर्शकांसोबत शेअर करतो की स्पर्धकांना लवकरच धोकादायक आव्हानांचा सामना करावा लागेल.

बिग बॉसनंतर 'खतरों के खिलाडी'च्या नव्या सीझनमध्ये शिव ठाकरे दिसणार असल्याच्या बातम्यांना आधीच उधाण आलंय. तू खतरों के खिलाडीमध्ये जाणार आहेस, असेही निमृतने शिवला अनेकदा सांगितले आहे. घरातील ज्योतिषानेही शिवाला असेच काही संकेत दिले होते आणि तुझे भविष्य खूप उज्ज्वल असल्याचे ही सांगितले होते.

'बिग बॉस 16' चा फिनाले 12 फेब्रुवारीला होणार असून दबंग अभिनेता सलमान खान शो होस्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्याच्या एपिसोडमध्ये, प्रियांका चहर चौधरी आणि शालीन भानोट यांचा प्रवास व्हिडिओ दाखवला जाणार आहे. जे पाहून दोघेही भावूक झाले असून त्यांनी बिग बॉसचे आभार देखील मानले.

दुसऱ्या शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन, अर्चना गौतम यांना त्यांच्या प्रवासाचा व्हिडिओ पाहण्याची संधी मिळणार आहे. शिव ठाकरे स्टेजच्या दिशेने चालत येतो आणि बिग बॉस शिवला 'यारों का यार' आणि स्पर्धकांचे 'हृदय आणि मन' म्हणूनही संबोधतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

शिवाजी महाराजांना छत्रपती का संबोधलं जातं? जाणून घ्या ऐतिहासिक अर्थ

Mumbai: प्लॅटफॉर्मवर बसून पाहत होता पॉर्न व्हिडीओ, महिलेने तरुणाला धडा शिकवला; पाहा VIDEO

Vrindavan : वृंदावनला जाताय? मग या ७ ठिकाणी नक्कीच भेट द्या

Indian Railway: वंदे भारतच्या २४ फेऱ्या महाराष्ट्रातून, सर्वाधिक जाळं पुण्यात, वाचा कोणती Vande Bharat कुठून धावते?

SCROLL FOR NEXT