Adhipati- Akshara Engagement Photos Viral On Social Media Instagram
मनोरंजन बातम्या

Adhipati- Akshara Engagement Photos: ठरलं! मोठ्या थाटामाटात होणार अधिपती-अक्षराचा साखरपुडा; फोटो व्हायरल

Adhipati- Akshara Engagement Photos: सोशल मीडियावर अधिपती-अक्षराच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

Chetan Bodke

Adhipati- Akshara Engagement Photos Viral On Social Media

‘झी मराठी’वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. अल्पावधीतच मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत शिवानी रंगोळे, हृषिकेश शेलार, कविता लाड आहेत. लवकरच मालिकेमध्ये शिवानी रंगोळे आणि हृषिकेश शेलार यांचा साखरपुडा पार पडणार आहे. मालिकेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून असलेल्या मैत्रीचं लवकरच प्रेमामध्ये रुपांतर होणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर दोघांच्याही साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

अल्पावधीतच मालिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून मालिकेचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे ‘अक्षरा’चे, तर अभिनेता ऋषिकेश शेलारने ‘अधिपती’चे पात्र साकारले. मालिकेमध्ये अक्षरा आणि अधिपतीचा येत्या ४ सप्टेंबरला साखरपुडा पार पडणार आहे. नुकताच शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये, अक्षरा आणि अधिपती रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. दोघांच्याही या रोमँटिक लूकने आणि डान्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. सध्या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रेक्षकांना येत्या ४ सप्टेंबरपासून अक्षरा आणि अधिपतीचा साखरपुडा सोहळा पाहता येणार आहे. अक्षरा आणि अधिपतीच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. अक्षराने साखरपुड्यात लाल काठा पदराची पांढरी साडी, त्यावर मँचिंग लाल रंगाच्या बांगड्या, हार, नथ, कमरपट्टा असा सुंदर लूक तिने केला आहे. तर अधिपतीनेही अक्षराला मॅचिंग लाल रंगाचा कोट, पांढरा रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे. दोघेही या लूकमध्ये खूपच सुंदर दिसून येत आहे.

ही मालिका मार्च २०२३ पासून टेलिकास्ट होत असून टीआरपीच्या यादीत ही मालिका अव्वल आहे. शिवानी नुकतीच ‘सुभेदार’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत झळकली होती. तिच्या अभिनयाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Jyoti Chandekar: 'तू फसवलंस आजी...'; पूर्णा आजीला निरोप देताना 'ठरलं तर मग' परिवाराचे अश्रू अनावर

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

SCROLL FOR NEXT