Pratyusha Banerjee Case: प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय; याचिका फेटाळत सांगितलं...

Pratyusha Banerjee News: प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्या प्रकरणी न्यायालयाने बॉयफ्रेंड राहुल सिंगची याचिका कोर्टानं फेटाळली.
Pratyusha Banerjee Case Update
Pratyusha Banerjee Case UpdateSaam Tv
Published On

Pratyusha Banerjee Case Update

‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने १ एप्रिल २०१६ रोजी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. प्रत्युषाने या मालिकेमध्ये ‘आनंदी’चे पात्र साकारले असून तिला ‘बालिका वधू’ मालिकेच्या माध्यमातून चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. अभिनेत्रीच्या आत्महत्येमुळे अवघी टेलिव्हिजन इंडस्ट्री हादरून गेली होती.प्रत्युषाच्या आई- वडीलांनी तिच्या आत्महत्येनंतर तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगची पोलिस स्थानकात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. तिच्या आत्महत्या प्रकरणाचा खटला अजूनही न्यायालयात सुरू आहे. नुकत्याच सुनावणीमध्ये मुंबई न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे.

Pratyusha Banerjee Case Update
Rhea Chakraborty Boyfriend: रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा पडली प्रेमात?, प्रसिद्ध बिझनेसमनलाच करतेय डेट

अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर तिच्या आई- वडीलांनी राहुल राज विरोधात तक्रारही नोंदवली होती. ज्यामुळे त्याला तुरूंगामध्ये शिक्षा भोगावी लागली होती. राहुलने तिचा विश्वासघात केल्यामुळे प्रत्युषा डिप्रेशनमध्ये होती. डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे तिने त्यावर थेट आत्महत्येसारखंच पाऊल उचललं होतं. प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्या प्रकरणाच्या खटल्यावर नुकताच मुंबई न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायलयाने निकाल देताना, प्रत्युषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या राहुलची निर्दोष मुक्तता करत त्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सोबतच राहुलनेच प्रत्युषाला आत्महत्येचा विचार करायला भाग पाडल्याचं कोर्टानं सांगितलं.

Pratyusha Banerjee Case Update
Mahira Khan: पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज, ‘या’ बॉलिवूड चित्रपटानंतर आयुष्यच बदललं...

न्यायालयाने निकालामध्ये स्पष्ट केलंय की, राहुलने शारीरिक, भावनिक आणि आर्थिक छळामुळे आणि शोषणामुळे प्रत्युषा बॅनर्जी नैराश्य अवस्थेत गेली होती. सोबतच राहुलने प्रत्युषाचे दुःख कमी व्हावे या करिता कोणतेही ठोस पाऊलं उचलले नाही. पण प्रत्युषाला त्याने, आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश समीर अन्सारी (दिंडोशी न्यायालय) यांनी १४ ऑगस्ट रोजी सिंग यांची मुक्तता याचिका फेटाळताना ही टिप्पणी केली आहे. यावेळी न्यायालयाने प्रत्युषा बॅनर्जीच्या कथित बॉयफ्रेंडला क्लीन चिट देण्यासाठी नकार दर्शवला आहे.

Pratyusha Banerjee Case Update
Tu Mee Ani Amaiara Movie: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएंसरचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, लवकरच ‘तू मी आणि अमायरा’ तून येणार भेटीला

२४ वर्षीय प्रत्युषा बॅनर्जीने १ एप्रिल २०१६ रोजी गोरेगाव मधील तिच्या राहत्या घरी तिने गळफास घेत आत्महत्या केली. राहुल विरोधात कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त), ५०४ (हेतूपूर्वक अपमान), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि ३२३ (स्वैच्छिक दुखापत करणे) या भादवि कलमांतर्गत राहुलवर आरोप लावण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com