Taarak Mehta Ka Ooltah Chashmah 15 Years Completed You Tube
मनोरंजन बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah 15 Years Completed: ‘तारक मेहता...’ ची १५ वर्ष, ‘हसो हसाओ’ची थीम करत निर्मात्यांसह कलाकारांनी केलं सेलिब्रेशन

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Latest Episode: २००८ पासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेला १५ वर्ष पूर्ण झाले आहेत.

Chetan Bodke

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah 15 Years Completed: २००८ पासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेला १५ वर्ष पूर्ण झाले आहेत. ही मालिका नेहमीच प्रेक्षकांची पहिली पसंदी ठरली आहे. मालिकेला १५ वर्ष पुर्ण झाल्यामुळे मालिकेच्या सेटवर निर्मात्यांसह सर्वच कलाकरांनी एकच जल्लोष केला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मालिकेच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवर सक्सेस पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान, मालिकेला १५ वर्षे पूर्ण झाली असून २८ जुलै २००८ रोजी या शो पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला होता. नेहमीच प्रेक्षकांना या मालिकेचे निखळ मनोरंजन, दमदार कथा फारच भावली. मालिकेचे आतापर्यंत एकूण ३८०३ एपिसोड पूर्ण झाले आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेने नेहमीच टीआरपीमध्ये बाजी मारली आहे. काल अर्थात २८ जुलैला मालिकेला १५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे एक विशेष भाग देखील प्रसारित करण्यात आला, त्या स्पेशल एपिसोडमध्ये शोमधील सर्वच कलाकार गोकुळधाम सोसायटीमध्ये दिसले.

सक्सेसच्या या निमित्ताने हा खास एपिसोड शूट करण्यात आला आहे. त्या एपिसोडमध्ये सर्व कलाकार पावसात धमाल मस्ती करताना दिसून येत आहे. यावेळी स्पेशल एपिसोडमध्ये सुंदरलाल, तारक मेहताचे बॉस, बावरी, बागा आणि नट्टू काका देखील दिसले. शोच्या या स्पेशल एपिसोड दरम्यान सर्वच कलाकार पावसात भिजले होते.

या शोचे भारताप्रमाणे, जगभरातही चाहते आहेत. मालिकेतील अनेक सेलिब्रिटींनी मालिकेला सोडचिठ्ठी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेमध्ये दया भाभीचे पात्र साकारणारी दिशा वाकानी पुन्हा येणार असल्याची चर्चा झाली होती. परंतू ती अद्याप ती परतलेली नाही. आता पर्यंत मालिकेमध्ये दिशा वकानीसह निधी भानुशाली, भव्य गांधी, जेनिफर मिस्त्री बन्सीवाल, राज अनाडकट, मोनिका भदोरिया, मेहा मेहता, शैलेश लोढा सह अनेक सेलिब्रिटींना प्रेक्षक मिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VP Election : मोदींचा राहुल गांधींना मोठा झटका, इंडिया आघाडीची १५ मते फुटली, राजधानीत मोठ्या घडामोडी

Success Story: सरकारी नोकरी करत दिली UPSC; पाचव्या प्रयत्नात झाल्या IPS; मोहिता शर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Pune : पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार, रात्री ११ वाजता मावळ हादरलं, नेमकं काय घडलं?

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT