Srimad Ramayan Promo Instagram
मनोरंजन बातम्या

Srimad Ramayan Promo: ३६ वर्षांनंतर रामायण पुन्हा येतंय भेटीला, ‘श्रीमद् रामायण’ मालिकेचा प्रोमो रिलीज; ‘हा’ अभिनेता प्रभू श्री रामाच्या भूमिकेत

Srimad Ramayan Serial Latest Promo: पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर श्रीरामांची महागाथा अनुभवायला मिळणार आहे.

Chetan Bodke

Srimad Ramayan Promo

सध्या मराठी सिनेसृष्टीतच नाही तर, हिंदी सिनेसृष्टीतही पौराणिक आणि आध्यात्मिक कथा पाहायला मिळत आहे. सध्याच्या पिढीला माहीत नसलेल्या कथा मालिका, चित्रपट, डॉक्यूमेंट्री, वेबफिल्म आणि वेबसीरीजच्या माध्यमातून दिग्दर्शक प्रेक्षकांच्या भेटीला आणत असतात. अशातच येत्या काही दिवसामध्ये, प्रेक्षकांच्या भेटीला एक नवी मालिका येत आहे.

१९८७ मध्ये प्रक्षेपित झालेली रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका अनेकांना ठाऊक आहे. त्या मालिकेला कोरोना काळात पुन:प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यावेळी ह्या मालिकेने अनेक रेकॉर्ड्स मोडित काढले होते. आता ही मालिका पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

येत्या १ जानेवारी २०२४ पासून सोनी एन्टरटेन्मेंट या चॅनलवर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका टेलिकास्ट होणार आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, ही पौराणिक मालिका, प्रेक्षकांना एका प्राचीन काळात घेऊन जाईल, ज्या काळात प्रभावी स्वरूपात अस्तित्वात असलेली जीवनमूल्ये आणि शिकवण आजच्या काळात देखील सुसंबद्ध आहे. सोनी एन्टरटेन्मेंटच्या इन्स्टाग्राम पेजवर मालिकेचा प्रोमो भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचे दर्शन आपल्याला घडत आहे.

मालिकेमध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत अभिनेता सुजय रेऊ दिसत आहे. आपल्या भूमिकेविषयी अभिनेता सुजय रेऊ सांगतो, “ ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत ही भूमिका मिळणे ही बाब माझ्यासाठी फार गौरवास्पद आहे. कोट्यवधी लोकांचे आराध्य दैवत असलेल्या देवाची भूमिका साकारणे ही एक मोठी जबाबदारी आहे. प्रभू श्रीरामाची कथा म्हणजे माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा विषय आहे. श्रीराम कथा पडद्यावर जिवंत करणे हे माझ्यासाठी स्वप्न साकार होत असल्यासारखे आहे.”

या प्रोमोवरून ही मालिका एक भव्यदिव्य असल्याचे दिसत आहे. सध्या ह्या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या मालिकेबद्दल प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. सुजय व्यतिरिक्त प्राची बन्सल माता सीतेची भूमिका साकारणार आहे. बसंत भट्ट लक्ष्मणच्या भूमिकेत तर नीतू पांडे कैकेयीच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

विमान अपघातातील वैमानिकाचा फोटो व्हायरल, कॅ. सुमीत कपूर यांचा फोटो असल्याचा दावा

आयकर विभागने छापा टाकला; प्रसिद्ध उद्योजकाने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी एकत्र येणार? राज्यात चर्चांना उधाण

ठरलं! महाराष्ट्राला उद्या नवीन उपमुख्यमंत्री मिळणार, संध्याकाळी 5 वाजता शपथविधी|VIDEO

SCROLL FOR NEXT