Mukta And Sagar Wedding Look Instagram
मनोरंजन बातम्या

Premachi Goshta Serial Update: ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये लगीन घाई; संगीत सोहळ्यातला मुक्ता- सागरचा लूक व्हायरल, पाहा व्हिडीओ

Premachi Goshta Serial Latest News: स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका टीआरपी यादीमध्ये अव्वल स्थानावर पाहायला मिळत आहे. मालिकेमध्ये प्रेक्षकांना मुक्ता आणि सागरच्या लग्नाची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे.

Chetan Bodke

Mukta And Sagar Sangeet Look

सध्या टीआरपी लिस्टमध्ये स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका अव्वल पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेमध्ये मुक्ता आणि सागरच्या लग्नाची जोरदार तयारी होताना दिसत आहे. आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना मुक्ताचा संगीत सोहळा पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर मुक्ताचा संगीत सोहळ्यातील लूक जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. सध्या अभिनेत्रीच्या ह्या लूकची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होताना दिसत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत असून लग्नसोहळा सध्या मोठ्या थाटामाटात सुरू आहे. मालिकेमध्ये सध्या मुक्ता-सागरचा संगीत सोहळा सुरू आहे. यावेळी दोन्ही कुटुंबीयांचा डान्स आणि त्यांचा लूक चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या सोशल मीडियावर मुक्ता आणि सागरचा संगीत सोहळ्यातील लूक व्हायरल होताना दिसत आहे.

मुक्ताने संगीत सोहळ्याला, रेड कलरचा लेहेंगा घातलेला दिसत आहे. त्यावर व्हाईट कलरचे झुमके आणि ग्लॉसी मेकअप केलेला पाहायला मिळत आहे. सागरच्या लुकबद्दल बोलायचे तर, यावेळी सागरनेही मुक्ताला मॅचिंग ड्रेस परिधान केला आहे. (Social Media)

सागरने रेड कलरचा कोट, व्हाईट कलरचा कुर्ता आणि व्हाईट कलरची पँट असा शेरवानीचा लूक त्याने केला आहे. गेल्या आठवड्यामध्ये मुक्ता आणि सागरचा मेहेंदीचा कार्यक्रम निर्विघ्न पार पडला.

अगदी हसत खेळत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी दोन्हीही कुटुंबीयांमध्ये अनेक गंमती जंमती पाहायला मिळणार आहे. सर्वाधिक वरचढ कोण ?, ही चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (Tv Serial)

मुक्ता आणि सागरच्या संगीत सोहळ्याला ‘स्टार प्रवाह’च्या परिवारातील अनेक सदस्य हजेरी लावताना दिसणार आहेत. यावेळी आनंदी- सार्थकचा रोमँटिक डान्स तर मधुराणी आणि अबोली शास्त्रीय संगीतावर डान्स करणार आहे. तर सई सुद्धा कोळी गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे.

मुक्ता आणि सागरच्या संगीत सोहळ्यामध्ये मुक्ताची आई, वडील भावूक झालेले दिसत आहेत. मुक्ताच्या वडीलांनी तिच्यासाठी एक सुंदर गाणं गायलं आहे. या क्षणी सर्वच उपस्थितांचे डोळे पाणावले आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT