Agasteya Khandelwal: 'सुशांत सिंह राजपूतसारखा तुझा शेवट होईल', अभिनेत्याला ई-मेलद्वारे धमकी

Agasteya Khandelwal Threats Case: ३ वर्षांपासून सतत येणाऱ्या या धमक्यांना कंटाळून अभिनेत्याने थेट सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी (Cyber Police) या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
Agasteya Khandelwal Threats Case
Agasteya Khandelwal Threats CaseSaam Tv
Published On

Bollywood Actor Agasteya Khandelwal:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्याला सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून धमक्या देत त्याच्याकडून ३ लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अगस्त्य खंडेलवाल (२७ वर्षे) (Agasteya Khandelwal) असं या अभिनेत्याचे नाव आहे.

'सुशांत सिंह राजपूतसारखा तुझा शेवट होईल' अशाप्रकारच्या धमक्या त्याला ईमेल्सद्वारे येत होत्या. ३ वर्षांपासून सतत येणाऱ्या या धमक्यांना कंटाळून अभिनेत्याने थेट सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी (Cyber Police) या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने गुगल आणि सोशल मीडियावर अभिनेत्याच्या नावाने अनेक फेक अकाऊंट सुरू केले होते. या अकाऊंटवरून आरोपी अगस्त्यच्या नातेवाईक आणि मित्रांना आक्षेपार्ह आणि अश्लिल मेसेज पाठवत होता. अगस्त्यच्या पालकांसह १०० हून अधिक जणांना ई-मेलद्वारे अशाप्रकराचे अश्लिल मेसेज पाठवले जात होते. या ई-मेलमध्ये अगस्त्य आणि त्याच्या मैत्रिणींची बदनामी देखील करण्यात आली होती.

Agasteya Khandelwal Threats Case
Ashwini Kasar Buy New Home: स्वप्नपूर्ती! मराठमोळ्या अभिनेत्रीनं खरेदी केलं आलिशान घर, वाढदिवशीच दिलं स्वत:ला हटके गिफ्ट

अज्ञात आरोपी अगस्त्यला 'सुशांत सिंह राजपूतप्रमाणे त्याचा देखील शेवट होईल. अयस्वी कारकिर्दीमुळे तो देखील आत्महत्या करुन आपले जीवन संपवणार आहे', 'पुढील सात वर्षे छळासाठी तयार राहा.' , अशाप्रकारचे मेसेजेस आरोपीने अगस्त्यच्या मित्र आणि कुटुंबीयांना पाठवले होते. आरोपीने अगस्त्यकडे ३ लाख रुपयांची मागणी केली होती. '३ लाख रुपये दे अन्यथा तुझी बदनामी सुरूच राहिल.', अशाप्रकारची धमकी आरोपीने दिली हती. यासर्व त्रासाला कंटाळून अगस्त्यने शेवटी दक्षिण सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

Agasteya Khandelwal Threats Case
Gautami Patil New Song: सबसे कातील गौतमी पाटीलच्या 'घोटाळा'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, तुम्ही पाहिलंत का?

अभिनेत्याने दिलेल्या तक्रारीनंतर दक्षिण सायबर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५, ५०० , ३८३, ४६५, ४६८, ४७१ आणि कलम ६६ (सी) अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. अगस्त्यने सांगितले की, 'मला वाटते की कोणीतरी मुद्दाम मला धमकावत आहे आणि माझी बदनामी करण्यासाठी माझ्या मित्रांना आणि नातेवाईकांना असे ईमेल पाठवत आहे.' सध्या या प्रकरणाचा सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे. पण पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.

Agasteya Khandelwal Threats Case
Tanuja Discharged: ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांना दिलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com