Aai Kuthe Kay Karte Latest Episode News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte Latest Update: विशाखाच्या घटस्फोटाचं दु:ख लपवत देशमुखांच्या घरी हळदी समारंभाला सुरुवात

Aai Kuthe Kay Karte Daily Serial Update: एकीकडे विशाखाचा घटस्फोट होताना दिसणार आहे, तर दुसरीकडे ईशाचे विधीवत लग्न होताना दिसणार आहे.

Chetan Bodke

Aai Kuthe Kay Karte Latest Episode News: आई कुठे काय करते या मालिकेमध्ये लवकरच सनई- चौघड्यांची धून वाजणार आहे. एकीकडे विशाखाचा घटस्फोट होताना दिसणार आहे, तर दुसरीकडे ईशाचे विधीवत लग्न होताना दिसणार आहे. रोजच मालिकेत कथानकातील ट्वीस्ट येत असून लग्नाबद्दल प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची वाढली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मालिकेमध्ये ईशाने आणि अनिशने घरातल्यांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन लग्न केलं होतं. हे लग्न अरूंधती, अनिरुद्ध, आशुतोष, आजोबा, कांचनताई, सुरेखाताई आणि इत्यादी सदस्यांना हे लग्न अमान्य होतं.

ईशा- अनिशच्या लग्नासाठी विरोधात उभे राहिलेले सर्व घरातील सदस्य आता त्यांच्या लग्नासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. नुकतंच देशमुखांच्या घरी आता लगीनसराई सुरू झाली आहे.

नुकतंच घरामध्ये हळदी समारंभाची जोरदार सुरूवात झाली आहे. कांचन आजी सर्वांवर चिडचिड करताना, दिसत असून यश, अभी आणि ईशा हे तिघेही सध्या भावूक होताना दिसत आहे.

तेवढ्यात अरूंधती आणि आशुतोष सोबत त्याचे कुटुंबीय ईशाच्या हळदी समारंभाला पोहोचतात, त्यांच्या जाण्यानंतरच कार्यक्रमाला सुरूवात होते. अनिषला त्याच्याच हळदी समारंभात आई- वडील नसल्यामुळे त्यांच्या आठवणींमध्ये तो व्याकूळ होताना दिसत आहे.

दरम्यान, ईशा- अनिशने दोघांच्याही परिवाराविरोधात जाऊन लग्न केल्यामुळे त्यांचे कुटुंबीय त्यांच्यावर नाराज होतात. अनिशच्या हळदी समारंभात त्याचे आई- वडील प्रत्यक्षरित्या नाही तर, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ते सहभागी झाले आहेत. आई- वडीलांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे अनिशचे वडील त्याच्यावर रागावलेले आहे, हे त्याला व्हिडीओ कॉलवर दिसले. अनिशने केलेल्या चुकीबद्दल १०० वेळा माफी मागायला तयार होतो, पण तुम्ही लग्नासाठी या असं त्यांना कॉलवर बोलतो.

दरम्यान, ईशा- अनिशच्या लग्न सोहळ्यात अनिरुद्ध सामिल होत नाही. पुढच्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये, ईशा- अनिशच्या हळदीच्या कार्यक्रमात अनिरुद्ध सहभागी होत नसल्यामुळे ईशाला खूपच वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे घरात आनंदाचे वातावरण असताना, विशाखा केदारला घटस्फोट देणार असल्यामुळे घरातल्यांना केदारबद्दल खूपच काळजी वाटत आहे. मात्र, विशाखाचा हा निर्णय योग्य असल्याचे अनिरुद्ध सर्वच घरातल्या सदस्यांना तो सांगतो. काही झालं तरी आता विशाखाला पुन्हा इथून जाऊ देणार नाही असे तो सर्वांना सांगतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight loss tips : आता वजन कमी करण्यासाठी व्यायामाची गरज नाही, फक्त या ३ गोष्टी लक्षात ठेवा

Pune Rave Party: खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, त्याच सूटमध्ये २४ तास आधीही रंगली होती पार्टी

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

नवऱ्याला रेव्ह पार्टीत बेड्या, २४ तासानंतर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया, दोन ओळीत विषय संपवला

गेट ओलांडून घरात गेली अन् क्षणातच भिंत कोसळली; महिला थोडक्यात बचावली; VIDEO

SCROLL FOR NEXT