आलिया भट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील क्युट कपल आहे. या कपलचे अनेक चाहते आहेत. दोघे अनेकदा एकत्र दिसतात. परंतु आता आलियाने केलेल्या एका खुलाशामुळे रणबीर कपूरला ट्रोल करण्यात येत आहे.
आलियाने तिचा एक मेकअप रुटीन करतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल देखील होत आहे. या व्हिडीओमध्ये आलियाने सांगितले आहे की रणबीरला तिने लिपस्टिक लावलेले आवडत नाही.
आलिया भट पुढे असेही म्हणाली आहे, रणबीरला तिचा नॅचरल लुक जास्त आवडतो. जर तिने लिपस्टिक लावली तर रणबीर तिला ती पुसायला सांगतो. यामुळे रणबीर सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे.
सोशल मीडियावर एका युजरने रणबीरला टॉक्सिक म्हटलं आहे. आलियासोबत रणबीरचे हे असे वागणे नेटकऱ्यांना अजिबात आवडलेले नाही. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की रणबीर, आलियावर त्याची मते लादत आहे. रणबीरचे पुरुषवादी विचार यातून स्पष्ट दिसतात, असे देखील नेटकरी म्हणत आहेत.
व्होग इंडियाने आलियाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये आलिया लिपस्टिक कशी लावायची याविषयी सांगत होती. आलियाने सांगितले की ती न्युड रंगाच्या लिपस्टिक जास्त वापरते. त्यानंतर तिने लावलेली लिपस्टिक पुसून टाकली. त्यानंतर तिने रणबीर तिच्या लिपस्टिक लावण्यावरी आक्षेप आहे असे सांगितले. (Latest Entertainment News)
रणबीरला नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर आलिया भटने उत्तर दिले आहे की, "चांगली टीका करणे हा पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, परंतु तुम्हाला दुखावणारे टीकांनी तुम्हाला खूप त्रास देखील सहन करावा लगावून शकतो. त्यामुळे तुमचे जवळचे लोक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात." जे तुमच्याकडून दूर जाईल ते तुमच्याकडून काहीही घेऊ शकत नाही. तुमचे जीवन प्रेम आणि कृतज्ञतेने भरून टाका जेणेकरून नकारात्मकता तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही."
या सगळ्यात दुसरीकडे रणबीर कपूरला रेंज रोव्हर कंपनीच्या लक्झरी कारचा शौक आहे. त्याच्याकडे या कंपनीच्या अनेक महागड्या गाड्या आहेत. आता रणबीरने त्याच्या आवडत्या कार कंपनीची आणखी एक नवीन एसयूव्ही खरेदी केली आहे. इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या नवीन रेंज रोव्हरसोबत दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.