Aai Kuthe Kai Karte Serial Off Air Rumors Instagram
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kai Karte: काय सांगता... 'आई कुठे काय करते' प्रेक्षकांचा निरोप घेणार?, या मालिकेच्या वेळेत येतेय रेश्मा शिंदेची नवी मालिका

Aai Kuthe Kai Karte Serial: नेहमीच टीआरपी यादीमध्ये अव्वल ठरलेली 'आई कुठे काय करते' मालिका कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या नेटकऱ्यांमध्ये 'आई कुठे काय करते' मालिका बंद होणार की काय? अशी चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Aai Kuthe Kai Karte Serial Off Air Rumors

नेहमीच टीआरपी यादीमध्ये अव्वल ठरलेली 'आई कुठे काय करते' मालिका कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. मालिकेचे कथानक आणि खुर्चीला खिळवून ठेवणारा आशय असणारी ही मालिका कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ही मालिका टीआरपी यादीमधूनही खाली येताना दिसत आहे. सध्या स्टार प्रवाहावर अनेक नव्या मालिकांचा धडाका सुरू आहे. अशातच नुकतंच सोशल मीडियावर एका नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांमध्ये 'आई कुठे काय करते' मालिका बंद होणार की काय? अशी चर्चा होत आहे. (Tv Serial)

नुकतंच निर्मात्यांकडून 'घरोघरी मातीच्या चुली' नावाच्या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या मालिकेमध्ये 'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपा अर्थात अभिनेत्री रेश्मा शिंदे दिसत आहे. या मालिकेचा प्रोमो शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शन दिले की, 'एकट्या सूईचा स्वभाव टोचणारा असतो पण... नवी मालिका-घरोघरी मातीच्या चुली.' रेश्माचीही नवी मालिका येत्या १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे. आणि याच वेळेवर सध्या अरुंधतीची 'आई कुठे काय करते' ही मालिका टेलिकास्ट होत असते. (Star Pravah)

पण अद्याप तरी, निर्मात्यांकडून मालिका ऑफ एयर जाणार असल्याची कोणतीही चाहत्यांना हिंट दिलेली नाही. सध्याच्या कथानकामध्ये आशुतोष आणि अरुंधती यांच्या नात्यामध्ये दुरावा आला आहे. पण अद्याप तरीही ही मालिका संपणार की या मालिकेच्या वेळेमध्ये बदल होणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. या मालिकेसाठी आता कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. नवी मालिका येणार म्हटल्यावर आपसुकच टीआरपी चार्टमध्येही मोठ्या प्रमाणावर बदल होतो. (Serial)

रेश्मा शिंदेची 'घरोघरी मातीच्या चुली' नावाची मालिका सुरू झाल्यावर कोणकोणत्या मालिका टॉप ५ मध्ये राहतात आणि कोणत्या मालिका टॉप १० मध्ये येतात ?, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. या मालिकेचं कथानक अद्याप गुलदस्त्यात असून ही मालिका सुरू झाल्यावर 'रंग माझा वेगळा' या मालिके प्रमाणेच 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिकाही टीआरपी यादीमध्ये टॉपला येणार का ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT