Prajakta Mali Watch Bhakshak Film Instagram
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Watch Bhakshak Film: ‘भक्षक’ चित्रपट पाहून प्राजक्ता माळीने केले चाहत्यांना आवाहन, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Bhakshak Film: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सई ताम्हणकरचा ‘भक्षक’ चित्रपट पाहिला आहे. अभिनेत्रीने चित्रपटाचं खास कौतुक करत पोस्ट शेअर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Prajakta Mali Watch Bhakshak Film

सध्या सोशल मीडियावर सई ताम्हणकरच्या आणि भूमी पेडणेकरच्या ‘भक्षक’ (Bhakshak) चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. या चित्रपटाची फक्त चाहत्यांकडूनच नाही तर, समीक्षकांकडून आणि काही सेलिब्रिटी मंडळींकडूनही चित्रपटाचं कौतुक केलं जात आहे. नुकतंच मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सई ताम्हणकरचा ‘भक्षक’ चित्रपट पाहिला आहे. अभिनेत्रीने चित्रपटाचं खास कौतुक करत पोस्ट शेअर केली आहे.

प्राजक्ता कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक बालिकाश्रमातील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बालिकाश्रमातील काही मुलींसोबत दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करताना प्राजक्ताने एक सुंदर कॅप्शन दिलंय, "२ दिवसांपूर्वी Netflix वर “भक्षक” सिनेमा बघत होते आणि त्याच संध्याकाळी ह्या बालिकाश्रमाला भेट देण्याचा योग आला… कधी कधी आपल्या शेजारच्या बिल्डींगमध्ये, चौकातील रस्त्यांवरील झोपड्यांमध्ये, आपल्या अवतीभवती काय चालू असतं याची आपल्याला अजिबात कल्पना नसते."

पोस्टमध्ये पुढे प्राजक्ता सांगते, "अशाच काही भरकटलेल्या ठिकाणांहून ह्या मुली इथे आल्यात आणि त्यांचा इथे चांगला सांभाळ होतोय बघून बरं वाटलं. सजगपणे पहा, तुमच्याही अवतीभवती अशा मुली असतील तर त्यांच्या मदतीसाठी पुढे या. विरारमधील ह्या बालिकाश्रमाचा पर्याय तर खूलाच आहे.भक्षक जरूर पहा, म्हणजे मला नेमकं काय म्हणायचय हे ध्यानात येईल. सिनेमा, सिनेमा म्हणूनही उत्तमच झालाय." सध्या अभिनेत्रीचीही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. प्राजक्ताच्या ह्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पुलकित दिग्दर्शित ‘भक्षक’ चित्रपटामध्ये भूमी पेडणेकर, सई ताम्हणकर, आदित्य श्रीवास्तव, संजय मिश्रासह अनेक स्टारकास्ट मुख्य भूमिकेत आहेत. 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT