Myra Vaikul Jamal Kudu Dance Instagram/ @_world_of_myra_official
मनोरंजन बातम्या

Myra Vaikul Jamal Kudu Dance: छोट्या परीला बॉबी देओलच्या ‘जमाल कुडू’ ची भुरळ, व्हिडीओपाहून नेटकऱ्यांनी केलं आई वडीलांना ट्रोल

Myra Vaikul Viral Dance Video: बॉबी देओलच्या ‘जमाल कुडू’ गाण्याची छोट्या परीलाही भुरळ पडली आहे. या शेअर केलेल्या रिलमुळे मायरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Myra Vaikul Jamal Kudu Dance

‘ॲनिमल’ चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान चर्चा होताना दिसते. चित्रपटाप्रमाणेच चित्रपटातील गाण्याचीही सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. बॉबी देओलच्या ‘जमाल कुडू’ गाण्याची सर्वांनाच भुरळ पडली आहे.

फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनीही त्या गाण्यावर ठेका धरला आहे. अशातच मराठी टेलिव्हिजनसृष्टीतील बालकलाकार मायरा वायकूळ हिने या गाण्यावर एक रिल शेअर केला आहे. या शेअर केलेल्या रिलमुळे मायरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Marathi Actress)

नुकतंच आपण सर्वांनी २०२३ या वर्षाला निरोप देत २०२४ या वर्षाचं धुमधडाक्यात स्वागत केलं आहे. सामान्य माणसांपासून सेलिब्रिटींनीही जंगी सेलिब्रेशन करीत नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे. नव्या वर्षाचं निमित्त साधत मायरा वायकूळ हिने इन्स्टाग्रामवर ‘जमाल कुडू’ गाण्याचा रिल शेअर केला आहे. या शेअर केलेल्या रिलमुळे ती सोशल मीडियावर तुफान प्रचंड चर्चेत आली आहे. या रिलमध्ये अगदीच बॉबी देओलसारख्याच डान्स स्टेप केल्या आहेत. (Social Media)

व्हायरल व्हिडीओमध्ये, तिने शर्ट आणि जिन्स परिधान केलेला दिसतोय. डोक्यावर ग्लास आणि सेम टू सेम बॉबी देओलसारख्याच डान्स स्टेप्स तिने केलेल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना बॉबी देओलच्या स्टाईलमध्ये न्यू इयरच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खटकला असून अनेकांनी मायराच्या आई-वडिलांना ट्रोल केलं आहे. तर काहींनी हा व्हिडीओ डिलीट करावा, अशी प्रतिक्रियाही तिला केल्या आहेत. एकंदित मायराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Trolled)

मायराला आणि तिच्या आई- वडीलांना ट्रोल केल्यानंतर त्यांनी या व्हिडीओचा कमेंट्स बंद केला आहे. मायरा वायकुळच्या कामाबद्दल सांगायचे तर, मायराने श्रेयस आणि प्रार्थनाच्या 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. त्यासोबतच गेल्या काही दिवसांपूर्वी 'नीरजा- एक नयी पेहचान' या मालिकेच्या माध्यमातून तिने हिंदी सिनेसृष्टीत डेब्यू केले आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

SCROLL FOR NEXT