Dancer Madhuri Pawar Brother Akshay Passed Away
Dancer Madhuri Pawar Brother Akshay Passed Away Instagram
मनोरंजन

Madhuri Pawar Post: ‘रानबाजार’ फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाचा आकस्मिक मृत्यू

Chetan Bodke

Dancer Madhuri Pawar Brother Akshay Passed Away

मराठी सिनेसृष्टीतून दु:खद बातमी येत आहे. ‘रानबाजार’ फेम अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना माधुरी पवार हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच अभिनेत्री इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत भावाच्या निधनाचे वृत्त दिले आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या भावाचे निधन १२ दिवसांपूर्वी झाले असून तिने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. माधुरीच्या भावाचे अचानक निधन झाल्यामुळे माधुरी आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, त्याने केलेल्या मदतीचा आणि स्वप्नांचा उल्लेख करत भावनिक पोस्ट शेअर केली.

दरम्यान पोस्टमध्ये माधुरी पवार सांगते, “प्रिय अक्षय, तुला जाऊन १२ दिवस झाले... हे शब्दात व्यक्त करायची वेळ आली यासारखं दुर्दैव नाही. नियतीच्या मनात नेमकं काय चालू आहे हे कुणी सांगू शकत नाही... उद्याचा दिवस कोणी पाहिलाय, असं आपण बऱ्याचदा म्हणतो... खरंय... उद्याचा दिवस पाहता आला असता तर मी माझ्या आयुष्यात माझ्या भावाच्या बाबतीत अचानकपणे घडलेली दुखःद घटना घडण्यापासून थांबवू शकले असते. तुझ्या असण्याची इतकी सवय झाली आहे ना की तू नाहीयेस ही कल्पनाच सहन होत नाहीये. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीत तुझी साथ होती, मग माझे इव्हेंट्स असो किंवा काही, तू माझ्याबरोबर असायचास, बऱ्याचवेळा माझ्या वतीने माझ्या अनुपस्थितीत आपलं घर सांभाळलंस, घरच्यांना सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस.” (Actress)

आपल्या पोस्टमध्ये माधुरी म्हणते, “मला तुझा खूप आधार वाटायचा. स्वयंपाकाची आवड असल्यामुळे आपलं हॉटेल सुरू करायचं तुझं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं होतं ना. तू कोणालाही कधी ‘नाही’ असं बोलला नाहीस. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उभा राहिलास, कुठल्याही कामाला कमी लेखलं नाहीस, कुटुंबासाठी, मित्रांसाठी सदैव उभा राहिलास, आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर तू आपलेपणाचं नातं तयार केलं होतंस. कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाहीस, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सतत झगडत राहिलास. कायम स्वतःपेक्षा बहिणींच्या कामाला प्राधान्य दिलंस, या तुझ्यातील सर्व गुणांचा मला अभिमान होता आणि कायम असेल.” (Marathi Actress)

आपल्या पोस्टमध्ये माधुरी म्हणते, “तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामुळे मला काम करण्यासाठी वेगळी उर्जा मिळायची. बहिणींच्या प्रेमापोटी तुला भाऊ म्हणून जे-जे करणं शक्य होतं, ते तू केलंस. आई-बाबांचे संस्कार आणि आमच्या दोघांमधला समजूतदारपणा यामुळे आमच्यात कधी भांडणं झालीच नाही. तू माझा लाडका होतास आणि कायम राहशील. गेली अनेक वर्षे रक्षाबंधन आणि भाऊबीज आपण उत्साहात साजरी करायचो, यंदाचे रक्षाबंधनाचे तुझ्यासोबतचे क्षण आठवत आहेत, पण दिवाळीतील भाऊबीज आठवून जास्त त्रास होतोय. एका सावलीसारखा तू सोबत असायचा. पुढच्या प्रवासात तुझ्याशिवाय जगायची सवय कशी करून घेऊ?” (Entertainment News)

पोस्टच्या शेवटच्या भागात अभिनेत्री सांगते, “माझा नेहमी अट्टाहास असायचा की, अक्षय तुला खूप काही द्यावसं वाटतंय, तुझ्या इच्छा पूर्ण करावाशा वाटत आहेत आणि मी ते नक्की करेन. मी नक्कीच गेल्या जन्मी पुण्य केलं असणार म्हणून मला या जन्मी तुझा सारखा भाऊ मिळाला. पण तुझ्यासोबत आयुष्य अजून जास्त जगायला नक्कीच आनंद झाला असता.... जिथे कुठे असशील तिथे देखील सगळ्यांना हसत खेळत ठेवशील याची मला खात्री आहे. माझ्या करियरमध्ये तुझा सर्वात जास्त मोलाचा वाटा होता, मला एका मोठ्या उंचीवर तुला पाहायचं होतं, तुझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी नक्की अजून मेहनत घेईन आणि कामाची जोमाने सुरुवात करेन. तुझी साथ, तुझं प्रेम, तुझा पाठिंबा माझ्या पाठीशी तसाच कायम ठेव ! पण तुझी उणीव माझ्या मनात आणि आयुष्यात कायम राहणार अक्षू” दरम्यान, माधुरीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकरी कमेंट करत अभिनेत्रीच्या भावाला श्रद्धांजली वाहत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Petrol Diesel Rate (24th Feb 2024) : मध्यप्रदेशमध्ये पेट्रोल-डिझेलचा भाव स्थिर, महाराष्ट्रात इंधनाचा आजचा दर किती?

Hemant Patil On Reservation | मराठा आरक्षणावर हेमंत पाटील काय म्हणाले? | Marathi News

Yugendra Pawar शरद पवारांसोबतच ,पवारांसोबतचा फोटो केला ट्विट!| Marathi News

Car Accident News: भरधाव कार दुचाकीला धडकून झाडावर आदळली; भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू

कालवा समितीच्या बैठकीनिमित्त Pune मध्ये काका-पुतण्या एकत्र!| Marathi News

SCROLL FOR NEXT