Divya Prabha Alleges Harassment: 'तो माझ्या बाजुला येऊन बसला आणि...', प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विमानामध्ये घडला धक्कादायक प्रकार, पोस्ट होतेय व्हायरल

Divya Prabha News: मल्याळम अभिनेत्रीसोबत विमान प्रवासामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. घटना घडताच अभिनेत्रीने पोलिस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
Divya Prabha Alleges Harassment On Flight
Divya Prabha Alleges Harassment On FlightInstagram
Published On

Divya Prabha Alleges Harassment On Flight

मल्याळम अभिनेत्रीसोबत विमान प्रवासामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. घटना घडताच अभिनेत्रीने पोलिस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (९ ऑक्टोबर) मल्याळम अभिनेत्री दिव्या प्रभा सोबत मुंबई ते कोची असा प्रवास करत होती. यावेळी तिच्यासोबत एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशाने प्रवासात गैरवर्तवणूक केल्याचा आरोप पोस्टच्या माध्यमातून केला आहे. (Social Media)

Divya Prabha Alleges Harassment On Flight
South Actor Nassar's Father Mahboob Basha Dies: 'बाहुबली' फेम अभिनेत्याला पितृशोक, वडीलांच्या निधनामुळे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणाली, “ माझ्यासोबत प्रवासामध्ये, एअर इंडियाच्या विमानात 12C या सीटवर एक मद्यधुंद अवस्थेत प्रवासी होता. मी 12A सीटवर बसले होते. काही वेळाने तो माझ्या बाजुला 12B या सीटवर येऊन बसला. काही वेळानंतर विनाकारण त्या मद्यधुंद प्रवाशाने माझ्यासोबत उगाच भांडायला सुरूवात केली. भांडत असताना त्या सहप्रवाशाने आधी माझ्यासोबत जागेवरून वाद घातला, आणि नंतर शारीरिक गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करु लागला.” (Tollywood)

पुढे आपल्या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते, त्या प्रवाशाची मी एअरहोस्टेसकडे तक्रार करत मदतीची मागणी केली. पण, विमान प्रशासनाकडून त्या प्रवाशावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, फक्त त्या प्रवाशाला दुसऱ्या जागेवर बसवण्यात आलं. कोची विमानतळावर उतल्यानंतर मी माझ्यासोबत घडलेली सर्व घटना विमानतळ आणि एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांना सांगितली. त्यांनी लगेचच कारवाईचा बडगा उचलत सहप्रवाशाने केलेल्या गैरवर्तनाबद्दल तक्रार नोंदवली.” (Actress)

Divya Prabha Alleges Harassment On Flight
Ira Khan Marriage Date: अखेर मुहूर्त ठरला! या दिवशी आयरा-नुपूरचं लग्न, आमिर खानने सांगितली जावयाची ती खास गोष्ट

विमानात घडलेला सर्व प्रकार अभिनेत्रीने पोलिसांना सांगितला. तिची अधिकृत तक्रार सुद्धा पोलिसांकडे नोंदवली. त्यासोबतच विमान प्रवासाची तिकीटेही तिने जोडली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तिने लोकांना पाठिंबा देण्याची विनंती, पोस्टच्या माध्यमातून केली आहे. (Entertainment News)

Divya Prabha Alleges Harassment On Flight
Hemangi Kavi Post: हेमांगीची स्वप्नपूर्ती, बिग बींसोबत काम करायला मिळाल्यामुळे अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com