Hemangi Kavi Special Post
Hemangi Kavi Special PostInstagram

Hemangi Kavi Post: हेमांगीची स्वप्नपूर्ती, बिग बींसोबत काम करायला मिळाल्यामुळे अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

Hemangi Kavi News: हेमांगीला थेट बिग बींसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. आज बिग बींच्या वाढदिवसानिमित्त बिग बींसोबतच्या कामा दरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Published on

Hemangi Kavi Special Post

हेमांगी कवी ही मराठी टेलिव्हिजनसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हेमांगीने आपल्या सिनेकारकिर्दित नाटक, सिरीयल, चित्रपट, वेबसीरीज या चारही माध्यमांमधून अभिनयाचा ठसा चाहत्यांमध्ये निर्माण केला. हेमांगी कायमच सोशल मीडियावर रिल लाईफ आणि रियल लाईफविषयी पोस्ट शेअर करत असते. नुकतंच अभिनेत्रीने रिल लाईफबद्दल एक पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आज बिग बींचा वाढदिवस. त्यानिमित्ताने हेमांगी कवीने चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली. हेमांगीला थेट बिग बींसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे तिच्या पोस्टची प्रचंड चर्चा होते.

Hemangi Kavi Special Post
Tiger 3 New Poster: 'तयार राहा...टायगर येतोय', 'टायगर ३'च्या नव्या पोस्टरमध्ये दिसला सलमान खानचा खतरनाक लूक

हेमांगीने नुकतंच अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बिग बी आणि हेमांगी दोघेही एकत्र दिसत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीने रिलमध्ये जाहिरातीतल्या सेटवरील काही BTS सीन्स शेअर केले आहेत. अभिनेत्रीला जाहिरातीच्या माध्यमातून बिग बींसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे अभिनेत्रीची सोशल मीडियावर प्रचंड चर्च होत आहे. पोस्ट शेअर करताना, अभिनेत्रीने बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Amitabh Bachchan)

अभिनेत्री आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “क्या कहूँ की खुशी, आश्चर्य, घबराहट, shock, respect से है लब सिले हुए! जिथे शब्द संपतात… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अमिताभ बच्चन सर... उद्या सविस्तर पोस्ट लिहीते. आधी मला स्वतःला स्वीकारायला वेळ द्या.” अशी पोस्ट हेमांगीने लिहिली आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे हेमांगीच्या आनंद गगनात मावेनासा झाला असेल यात शंका नाही. (Entertainment News)

Hemangi Kavi Special Post
Kiran Mane Post: ‘सोशल मीडियावरुन जहरी टीका करणारा बच्चन आज...’ बिग बींबद्दल किरण माने जरा स्पष्टच बोलले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com