दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी येत आहे. टॉलिवूड चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते आणि बाहुबली फेम नासर यांचे वडील महबूब बाशा यांचे निधन झाले आहे. नासर यांच्या वडीलांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, अभिनेत्याच्या वडीलांची गेल्या अनेक दिवसांपासून तब्येत बरी नव्हती. अभिनेत्याच्या वडीलांनी तामिळनाडूतल्या चंगेलपेट येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
वडिलांच्या निधनामुळे अभिनेता नासरसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महबूब बाशा यांच्या निधनामुळे टॉलिवूडमधील अनेक कलाकरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बुधवार, (११ ऑक्टोबर) रोजी मेहबूब बाशा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Tollywood)
अभिनेता नासर हे टॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दित अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या नासर हे ॲक्टर्स युनियनचे अध्यक्ष आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार, मेहबूब बाशा यांना सुरुवातीपासूनच आपल्या लेकाला (नासरला) अभिनेता बनवायचे होते. आपल्या मुलाला अभिनेता बनवण्यासाठी त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला. नासर यांचे वडील मेहबूब बाशा हे पेशाने आधीपासूनच ज्वेलरी पॉलिशिंगचे काम करायचे. त्यांनी आपल्या पगारातून लाडक्या लेकाला अभिनय कार्यशाळेत प्रवेश मिळवून दिला. (Actor)
नासर यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करत फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ इंडियन फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स आणि तमिळनाडू इन्स्टिट्यूट फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. घरची परिस्थिती खूप बेताची असल्यामुळे त्यांनी ॲक्टिंग सोडून चेन्नईतल्या एका हॉटेलमध्ये काम केले. पण नंतर परिस्थिती सुधारत गेल्यानंतर त्यांनी पुन्हा फिल्म इंडस्ट्रीत डेब्यु केले. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.