Sachin Deshpande Exit From Zee Marathi's Paaru Marathi  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Paaru Serial Update: ‘पारु’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; पोस्ट करत म्हणाला, “दीड आठवडा ह्या गोड मुलीला…”

Sachin Deshpande Exit from Paaru Serial: गेल्या काही दिवसांपूर्वी झी मराठीवर ‘पारू’ ही मालिका सुरू झाली आहे. ही मालिका अवघ्या काही दिवसांतच प्रसिद्धीझोतात आली आहे. या मालिकेचा चाहतावर्ग फार मोठा आहे.

Chetan Bodke

Sachin Deshpande Exit From Paaru Marathi Serial

गेल्या काही दिवसांपूर्वी झी मराठीवर ‘पारू’ ही मालिका सुरू झाली आहे. ही मालिका अवघ्या काही दिवसांतच प्रसिद्धीझोतात आली आहे. या मालिकेचा चाहतावर्ग फार मोठा आहे. ही मालिका सध्या टीआरपी चार्ट टॉप १५ च्या यादीत पाहायला मिळत आहे. अशातच या मालिकेत एक नवीन अपडेट समोर आली आहे. सध्या पारूचे वडील पारूचं लग्न करीत आहे.

मालिकेमध्ये पारूसोबत लग्न करण्यासाठी अजय तयार झालेला आहे. नुकतंच मालिकेमध्ये त्याची एन्ट्री झालेली आहे. तो दिशाच्या सांगण्यावरून पारूसोबत लग्न करण्यासाठी तयार होतो. अशातच आता मालिकेमध्ये, अजयचे पात्र साकारणाऱ्या अभिनेता सचिन देशपांडे याने मालिकेमधून एक्झिट घेतलेली आहे. यासंदर्भात त्याने स्वतः पोस्ट करून चाहत्यांना सांगितलं आहे.

‘पारु’ मालिकेत काही दिवसांसाठीच अजय पात्राची एन्ट्री झाली होती. तो जेमतेम दिड आठवड्यासाठी मालिकेमध्ये आला होता. त्याने मालिकेमध्ये पारुला खूप त्रास दिला. त्याने त्रास दिल्यानंतर त्याचा आता मालिकेतील अजयचा प्रवास संपला आहे. त्यामुळे अभिनेता सचिन देशपांडेची मालिकेतून एक्झिट झाली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने पारुबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. पोस्टमध्ये अभिनेता सचिन देशपांडे म्हणतो, “गेला दीड आठवडा ह्या गोड मुलीला मी ऑनस्क्रीन फार त्रास दिला. पण आम्ही ऑफस्क्रीन खूप छान मित्र झालो. तसं काम फार दिवसांच नव्हतं.”

सचिन देशपांडे आपल्या पोस्टमध्ये पुढे बोलतो की, “ पण जे काही उपद्व्याप करायचे होते. त्यासाठी शरयूने कम्फर्टेबल असणं फार गरजेचं होतं. पण उलट तिनेच मला कम्फर्टेबल केलं. शरयू बघ मी सगळं चांगलं बोललो आहे तुझ्याबद्दल. आता तरी ल्युडोमध्ये चिटिंग करू नकोस. आता नवीन काम, नवीन भूमिका घेऊन लवकरच येतो तुमच्यासमोर. सगळ्यांना खूप खूप प्रेम.” अभिनेत्याचीही पोस्ट सध्या इन्स्टाग्रामवर चांगलीच व्हायरल होत असून चाहत्यांकडून सचिनला तुफान ट्रोल केले जात आहे. त्याच्या भूमिकेमुळे त्याला चाहते ट्रोल करीत आहेत.

१२ फेब्रुवारीपासून ‘पारु’ मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत, शरयू सोनावणे, प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक, पूर्वा शिंदे, परी तेलंग, अनुज साळुंखे, प्राजक्ता वाडये, विजय पटवर्धन अशी तगडी स्टारकास्ट आहे. ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

Face Care: चेहऱ्याला फ्रेश आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा 'हा' डी-टॅन फेसपॅक

Shocking : संतापजनक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; मांत्रिकाचं 'अघोरी' कृत्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

SCROLL FOR NEXT