Kannada Film Producer Soundarya Jagadish Dead
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. कन्नड चित्रपटाचे निर्माते आणि बिझनेसमन सौंदर्या जगदीश (Soundarya Jagadish) यांनी आत्महत्या केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सौंदर्या जगदीश यांनी १४ एप्रिलला रविवारी सकाळी बंगळूरु मधील राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर लगेचच त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. (Tollywood)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौंदर्या जगदीशचा मित्र श्रेयस ह्याने दिलेल्या माहितीनुसार सौंदर्या जगदीशने आत्महत्या करताच त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सौंदर्या जगदीश यांनी आत्महत्या का केली, इतकं मोठं पाऊल का उचललं ? याचा पोलिस सखोल तपास करत आहेत. सोबतच श्रेयसने दिलेल्या माहितीनुसार, सौंदर्या जगदीश आजारी नव्हता, त्याची तब्येत व्यवस्थित होती. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस घटनेची सखोल चौकशी करीत आहे. (Actor)
अभिनेत्याच्या आत्महत्येमुळे, दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त कळताच चाहत्यांसह त्याच्या अनेक सेलिब्रिटी मित्रांकडून त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे. चित्रपट निर्माते आणि बिझनेसमन सौंदर्या जगदीश यांना काही दिवसांपूर्वी बँकेकडून नोटीस मिळाली होती. बँकेच्या नोटीसचा आणि आत्महत्येचा काही संबंध आहे का, असे जगदीशच्या मित्राला विचारले असता, त्याने ही शक्यता फेटाळली आहे. याबद्दल श्रेयसने सांगितले की, बँकेच्या नोटीसचा आणि आत्महत्येचा काहीही संबंध नाही. सध्या सोशल मीडियावर सौंदर्या जगदीशचे कार्डियक अरेस्टने निधन झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. त्या बातम्याही चुकीच्या असल्याचे सांगितलं. (Bollywood Film)
गेल्या काही दिवसांपूर्वी, सौंदर्या जगदीशच्या सासूचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनाने सौंदर्याला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. सासूच्या निधनामुळे सौंदर्या डिप्रेशनमध्ये गेला होता. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते, हे देखील कारण सांगितले जात आहे. सौंदर्या जगदीश एक चित्रपट निर्माते आणि बिझनेसमन होता. त्याचा एक पबही होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वी एका पार्टीमुळे त्याचा पब वादात सापडला होता. यानंतर पबचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.