Hardik Joshi Emotional Post Instagram
मनोरंजन बातम्या

Hardik Joshi: हार्दिक जोशीच्या कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘तू आज आमच्यात नाहीस, पण…’

Hardik Joshi: ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता हार्दिक जोशीच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीचे निधन झाले.

Chetan Bodke

Hardik Joshi Emotional Post

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता हार्दिक जोशी गेल्या अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. कधी चित्रपटामुळे तर मालिकेमुळे चर्चेत राहणारा हार्दिक जोशीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याने एक भावूक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये हार्दिक जोशीने एका व्यक्तीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. सोबतच त्याने पोस्टमध्ये एक खास योगायोगही शेअर केला आहे. अनेकदा आपल्या व्यक्तीचं जीवनात नसणं मान्य करणे खूप कठीण असते. अशावेळी भावना शब्दात मांडून व्यक्त होणे अत्यंत गरजेचे असते. (Marathi Actors)

हार्दिक जोशीची पोस्ट

“ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीये, पण तुझं अस्तित्व आमच्यात कायम राहील. ‘जाऊ बाई गावात’ हा जो नवीन शो मी करत आहे झी मराठीवर तो फक्त तुझ्यामुळे तो पुर्ण शो मी फक्त तुलाच डेडिकेट करतोय. कारण तू माझा हात हातात घेऊन प्रॉमिस घेतलं होतस की हार्दिक काही झाल तरी हा शो तू करणारच आहेस आणि योगायोग असा आहे की ४ डिसेंबरच्या दिवशी हा शो टीव्हीवर दिसायला सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी तुझा वाढदिवस आहे. मी नेहमी कामाला जाताना तुला नमस्कार करायचो, तेव्हा कायम डोक्यावर हात फिरवून तू मला आशीर्वाद द्यायची. तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असुदे. आज मी जे काही आहे त्यात तुझा खुप मोठा वाटा आहे. तु सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणुन माझ्यासोबत पाठीशी होतीस तशीच कायम रहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल. मिस यू ज्योती. माझी लाडकी वहिनी मला कधी विसरु नको. ” (Social Media)

हार्दिकच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 'जाऊ बाई गावात' या शोमधून हार्दिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘क्लब ५२’ मध्ये हार्दिक जोशी मुख्य भुमिकेत दिसणार आहे. येत्या १५ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ नंतर हार्दिक जोशी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

पिपाणी गेली, तुतारी राहिली! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आयोगाचा दिलासा

SCROLL FOR NEXT