Pushkar Jog
Pushkar JogSaam Tv

Pushkar Jog Post: ‘हे वागणं चुकीचे...’; पुष्कर जोग मराठी निर्मात्यांवर संतापला, नेमकं काय घडलं?

Pushkar Jog News: बॉक्स ऑफिसवर दोन मराठी चित्रपट एकच दिवशी रिलीज होणार आहेत. जर त्या चित्रपटांची रिलीज डेट बदलली नाही तर, पुन्हा एकदा मराठी इंडस्ट्रीला याचा फटका बसेल असं स्पष्ट मत पुष्कर जोगने मांडले.
Published on

Pushkar Jog Post

एकाच दिवशी दोन चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाले तर, त्याचा फटका संबंधित चित्रपटाच्या निर्मात्यांना बसतो. आपण अनेकदा बॉलिवूडमध्ये बिग बजेट सिनेमे एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेले पाहिले आहेत.

अनेकदा काही चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलली जाते, तर काही चित्रपटांची तारीख बदलली जात नाही. असाच काहीसा प्रकार सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये घडण्याची शक्यता आहे. आगामी वर्षात बॉक्स ऑफिसवर दोन मराठी चित्रपट एकच दिवशी रिलीज होणार आहेत. जर त्या चित्रपटांची रिलीज डेट बदलली नाही तर, पुन्हा एकदा मराठी इंडस्ट्रीला याचा फटका बसेल असं स्पष्ट मत पुष्कर जोगने मांडले. (Marathi Film)

Pushkar Jog
Priyadarshini Indalkar Post: ‘लग्नाला ६० दिवस बाकी’, प्रियदर्शनीच्या पोस्टने अभिनेत्रीच्या लग्नाची एकच चर्चा

नुकतंच पुष्कर जोग निर्मित, ‘मुसाफिर’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली. पुष्कर जोगचा ‘मुसाफिर’ चित्रपट येत्या २ फेब्रुवारी २०२४ ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटासोबत सिद्धार्थ आणि सईचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर हे दोन्हीही चित्रपट एकत्रित रिलीज होणार असल्यामुळे या विषयी पुष्करने सोशल मीडियावर उघड नाराजी व्यक्त केलीय. (Marathi Actors)

Pushkar Jog Post
Pushkar Jog PostInstagram

अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोगने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करताना, सईच्या आणि सिद्धार्थच्या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. ‘आम्ही ‘मुसाफिर’ची रिलीज डेट आधीच जाहीर केली होती. आणि आता ‘श्रीदेवी प्रसन्न’ची घोषणा करण्यात आली आहे. याबद्दल संबंधित निर्मात्यांसोबत का बोलून घेत नाहीत?, एक कॉल किंवा एक मॅसेज करावासा वाटत नाही? चित्रपटांचे क्लॅशेस होऊ नये, यासाठी आम्ही ३ महिने आधीच रिलीज डेट जाहीर केली. पण हे असं वागणं चुकीचे आहे. कृपया, तुमच्या चित्रपटाची तारखेत बदल करा ही नम्र विनंती! या पूर्वीही असंच घडलं होतं, यामुळे कोणालाच फायदा होत नाही.’ असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. (Film Producer)

Pushkar Jog
Rakhi Sawant Birthday: दोन लग्ने झाली, दोन्हीही संसार मोडले,४५ वर्षांची राखी सावंत जगतेय 'सिंगल' आयुष्य

पुष्करने या पोस्टच्या माध्यमातून आपली मनातली खदखद व्यक्त केली. यापूर्वी सुद्धा पुष्करच्या ‘बापमाणुस’ चित्रपटाच्या रिलीज वेळी रिलीज डेट पुढे ढकलावी लागली होती. आता सिद्धार्थ आणि सईच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’चे निर्माते प्रदर्शनाच्या तारखेत बदल करणार का?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Entertainment News)

Pushkar Jog
Vicky- Ankita Mothers In Bigg Boss 17: ‘घरामध्ये कधी भांडले नाही, मग इकडे का भांडताय?’ असा सवाल उपस्थित करत आईने केली विकीची कानउघडणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com