Arun Kadam Son In Law Special Post Instagram
मनोरंजन बातम्या

Arun Kadam Son In Law Special Post: “आम्हाला आणि आमच्या बाळाला…”, बाळाच्या जन्मानंतर हास्यजत्रा फेम अभिनेते अरुण कदम यांच्या जावयाची पोस्ट चर्चेत

Arun Kadam News: अरूण कदम यांचे जावई सागर पोवाळेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी संपूर्ण परिवाराचा फोटो कोलाज करून शेअर केला आहे.

Chetan Bodke

Arun Kadam Son In Law Special Post

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दादूस उर्फ अरूण कदम यांची मुलगी सुकन्या हिने १९ ऑगस्ट रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. नुकतेच अरूण कदम यांचे जावई सागर पोवाळेने एक पोस्ट शेअर केली आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी संपूर्ण परिवाराचा फोटो कोलाज करून शेअर केला आहे.

सुकन्याने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्मानंतर इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये, अरुण कदम, त्यांची बायको आणि लेकीच्या सासरचे कुटुंबीय ही दिसत आहे. फोटो शेअर करताना, सागर पोवाळे कॅप्शनमध्ये म्हणतात, “गणपती बाप्पा आणि श्री स्वामी समर्थ यांच्या आशिर्वादाने आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. यामुळे आमचे कुटुंब दोन पावलांनी वाढले आहे. आम्हाला आणि आमच्या बाळाला तुमच्या आशिर्वादांची गरज आहे” अशा आशयाची पोस्ट अरूण कदम यांच्या जावयाने शेअर केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सुकन्या आणि तिच्या पतीने अगदी मराठमोळ्या पद्धतीतील कपडे परिधान करत बेबी बंप फोटोशूट केलं होतं. आपल्या लेकीच्या डोहाळे जेवनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ अरुण कदम यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली होते. मध्यंतरी सुकन्या, तिचे पती आणि अरूण कदम यांनी खास पारंपारिक लूक करत मुंबईच्या मरिन ड्राईव्ह परिसरात खास फोटोशूट केलं होतं. त्यांचं हे फोटोशूट सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल झाले होते.

अरुण कदम यांची मुलगी सुकन्याने २०२१मध्ये सागर पोवाळेसोबत लग्नगाठ बांधली होती. सुकन्या पेशाने कमर्शिअल आर्टिस्ट आणि ग्राफिक डिझायनर असून ती भरतनाट्यम देखील शिकली आहे. अनेकदा सुकन्याने तिच्या वडिलांसोबत धम्माल मस्ती करतानाचे रील्स शेअर केले होते.

अरुण कदम यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दित अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली असून त्यांचे अनेक पात्र कायमच प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

Laxman Hake: ओबीसींसाठी आरक्षण संपलं! भुजबळांच्या मेळाव्याआधीच हाकेंचा एल्गार

Jio चे दमदार रिचार्ज प्लान्स! एका रिचार्जमध्ये 10 OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन एकदम FREE, तुम्ही पाहिलेत का?

Rohit Sharma-Virat Kohli : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्डकप खेळणार का? अजित आगरकर पहिल्यांदाच इतका स्पष्ट बोलला

Saturday Horoscope : धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ कार्य हातून घडणार; ५ राशींच्या लोकांना होणार धनलाभ

SCROLL FOR NEXT