ऑगस्ट महिन्यामध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची बरीच चर्चा सुरू आहे. अशातच सुपरस्टार रजनीकांत प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘जेलर’ ची देखील बरीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधींची कमाई केली होती. सध्या चित्रपटाच्या कथेची आणि गाण्यांची तुफान चर्चा होत आहे. चित्रपटातील ‘कावाला’ या गाण्याची सध्या तुफान चर्चा सुरू आहे. सोशल मीडियासह सर्वत्र नेटकरी त्या गाण्यावर व्हिडीओ बनवत शेअर करत आहेत. अशातच एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘कावाला’ गाण्याची प्रदर्शित झाल्या पासून नेटकऱ्यांमध्ये भलतीच क्रेझ पाहायला मिळते. अनेक सेलिब्रिटींपासून अनेकांनी हा व्हिडीओ बनवून शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तिच्या चेहेऱ्यावरील हावभावामुळे आणि खास डान्स मुव्हज ने सर्वांचेच लक्ष वेधले. या चिमुकलीने अगदी तमन्ना भाटिया सारख्याच डान्स स्टेप्स केल्या आहेत. हा व्हिडीओ @cutiepie_riva या हँडलने शेअर केला असून त्या गाण्यावर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
तमन्ना भाटियाच्या ‘कावाला’ गाण्याला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळतोय. रजनीकांतच्या चित्रपटातील गाण्यावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण डान्सचे व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. गाण्याबद्दल बोलायचे तर, या गाण्यामध्ये रजनीकांत आणि तमन्नाने डान्स केला आहे. ‘कावाला’ हे गाणं शिल्पा राव यांनी गायलं असून त्या गाण्याचे हिंदी व्हर्जन सिंधुजा श्रीनिवासनने गायले आहे. तर रकीब आलमने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. सोशल मीडियावर ‘कावला’ गाण्याचे रील्स तुफान व्हायरल होत आहे. ‘कावाला’ प्रमाणेच ‘तू आ दिलबरा’ हे गाणं देखील प्रेक्षकांची मनं जिंकून घेईल यात शंका नाही.
तमन्नाच्या ‘जेलर’चित्रपटाबद्दल बोलायचे तर, नेल्सन दिलीपकुमार लिखित आणि दिग्दर्शित, चित्रपट गेल्या १० ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटात तमन्ना आणि रजनीकांत व्यतिरिक्त मोहनलाल, जॅकी श्रॉफ, डॉ शिवा राजकुमार, रम्या कृष्णन, योगी बाबू, वसंत रवी आणि विनायकन हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाने ५५६.५ कोटींची कमाई केली आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.