सध्या 'घूमर' चित्रपटाची सर्वत्र चांगलीच चर्चा सुरू आहे. अभिषेक बच्चन आणि संयमी खेर यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. अभिषेक बच्चन एका कोचच्या भूमिकेत आहे, तर संयमी खेर एका हात गमावलेल्या महिला क्रिकेटरच्या भूमिकेत दिसत आहे. 'घूमर'मधल्या संयमीच्या अभिनयाने आणि तिच्या विशेष खेळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
सध्या संयमीचे विशेष कौतुक होत आहे ते, तिच्या मेहनतीचे. सध्या सर्वत्र 'गदर २' आणि 'OMG 2'ची चर्चा होत असताना, 'घूमर'ची चर्चा वाढत आहे. क्रिकेटचा देव म्हणून सर्वश्रु- असलेल्या सचिन तेंडुलकरने अभिनेत्री संयमी खेरची भेट घेतलीय. संयमीचा आणि सचिन तेंडुलकरच्या भेटीचा व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर करताना, एक खाली लांबलचक पोस्ट देखील लिहिली आहे. ती पोस्टमध्ये म्हणते, आपण लहानपणी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याची आनंदी भावना संयमी खेरने व्यक्त केली आहे. सचिन तेंडुलकर माझे गुरु, प्रेरणास्थान, शिक्षक. क्रिकेट मी यांच्याकडे पाहूनच शिकले. सचिन सरांमुळेच मला क्रिकेटची गोडी निर्माण झाली. मी अनेकदा कॉलेज बंक करुन सचिन सरांचा खेळ पाहायला गेली होती. आम्हाला खेळ सुरु असताना, सचिन- सचिन ओरडायला खूप आवडायचे. त्यामुळे सचिनसोबतची भेट माझ्यासाठी काय आहे हे शब्दात सांगू शकत नाही, असे ती म्हणाली.
संयमी खेरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, सचिन तिच्यातील गोलंदाजीच्या कौशल्याविषयी काही प्रश्न विचारताना दिसत आहे. संयमी त्याला तितक्याच आत्मविश्वासाने उत्तर देताना दिसते. संयमीच्या आणि सचिनच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्स देखील भन्नाट आहेत. सचिननं घूमर पाहिल्यानंतर सयामीसोबत संवाद साधला होता. यावेळी त्याने चित्रपटाचेच नाही तर, संयमीच्या अभिनयाचेही कौतुक केले. यावेळी सचिनने घूमरमध्ये संयमीने साकारलेल्या भूमिकेची प्रशंसा केली आहे.
आर बाल्की दिग्दर्शित ‘घूमर’ चित्रपटाचे समीक्षकांसह, सेलिब्रिटींनीही आणि प्रेक्षकांनी देखील तोंड भरून कौतुक केले आहे. १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ३.४० कोटींची कमाई केली आहे. एकीकडे सनीच्या गदर २ ने धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे घूमरनं देखील प्रेक्षकांना अवाक केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.