आफ्रिकन देशात Bollywood Celebrity भलतीच क्रेझ; 'या' अभिनेत्याच्या नावावर दुकानात मिळतो डिस्काऊंट

Shashi Kapoor News: एक असा बॉलिवूड सेलिब्रिटी आहे त्याचं नाव सांगितल्यावर आफ्रिकन देशातील दुकानात खरेदी केल्यावर डिस्काऊंट मिळतो.
Discount On Shashi Kapoor's Name
Discount On Shashi Kapoor's NameSaam Tv
Published On

Discount On Shashi Kapoor's Name

कायमच बॉलिवूड सेलिब्रिटींचा डंका फक्त भारतातच नाही तर जगभरात कायम आहे. आपल्या अभिनयामुळे आणि उत्तम आशयाच्या चित्रपटांमुळे भारतीय सेलिब्रिटी कायमच चर्चेत राहतात. बॉलिवूड सेलिब्रिटींची ओळख आता फक्त भारतापुरती मर्यादित न राहता जगभरात त्यांची हे कलाकार लोकप्रिय आहेत. शाहरुख खान, सलमान खान, रजनीकांत, प्रभास आणि अमिताभ बच्चन सह अनेक सेलिब्रिटींचं आवर्जून नाव घेतलं जातं. पण, या सगळ्यामध्ये एक असा सेलिब्रिटी आहे त्याचं नाव सांगितल्यावर चक्क दुकानात खरेदी केल्यावर डिस्काऊंट मिळतो.

Discount On Shashi Kapoor's Name
Adil Khan Durrani On Rakhi Sawant: मला ड्रग्ज दिले, मारहाण केली... आदिल खानचे राखी सावंतवर खळबळजनक आरोप

कपूर कुटुंबातील अनेक सेलिब्रिटी कायमच चर्चेत असतात. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे, शशी कपूर. शशी कपूर यांनी आपल्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे आणि दमदार व्यक्तिमत्वामुळे अवघ्या सिनेसृष्टीवर स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. शशी कपूर यांची प्रसिद्धी एकट्या भारतातच नाही तर परदेशातही कायम आहे. शशी कपूर यांची ४ डिसेंबर २०१७ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते. जरी ते आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. आफ्रिकन देशामध्ये त्यांचं नाव सांगितल्यावर डिस्काऊंट मिळतो, सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होते.

1965 मध्ये प्रदर्शित झालेला शशी कपूर यांचा 'जब जब फूल खिले' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या कायमच लक्षात आहे. हा चित्रपट त्यांच्या सिनेकारकिर्दित सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला होता. चित्रपटाप्रमाणेच चित्रपटातील प्रत्येक गाणंदेखील सुपरहिट ठरलं होतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला इतकी लोकप्रियता होती की, त्या चित्रपटाचे तिकिटे ब्लॅकमध्ये विकले होते. शशी कपूरचा तो चित्रपट १९६५ मध्ये चांगलाच प्रसिद्ध ठरला होता. चित्रपटाची लोकप्रियता फक्त भारतातच नाही तर, परदेशातही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता होती.

Discount On Shashi Kapoor's Name
Akshay Kumar's OMG 2: अक्षयच्या 'OMG 2' प्रेरणा, लैंगिक शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश; उल्हासनगरच्या संस्थेचा निर्णय...

१९६५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जब जब फूल खिले' या चित्रपटाला भारतातच नाही तर, उत्तर आफ्रिकन देशामध्येही लोकप्रियता मिळवली होती. मुख्य बाब म्हणजे, या चित्रपटामुळे त्यांच्या करिअरला एक वेगळीच प्रसिद्धी मिळाली. आफ्रिकन देशामध्ये असे काही जुने दुकानदार आहेत, जे शशी कपूर यांच्या नावावर चक्क दुकानात खरेदी केल्यानंतर डिस्काऊंट दिला जातो. शशी कपूर यांची अल्जेरिया, मोरेक्को आणि लिबिया यांसारख्या उत्तर आफ्रिकन देशांमध्ये तुफान क्रेझ आहे. शशी कपूर यांच्या देशातून आलेल्या अर्थात भारतातून आलेल्या पर्यटकांना मोरोक्कोमधील माराकेशच्या बाजारपेठांमध्ये खरेदीवर चांगला डिस्काऊंट दिला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com