अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्टारर 'OMG 2' प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाची तुफान चर्चा सुरू आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन तब्बल एक आठवडा झाला असून चित्रपटाने पहिल्या आठवड्यात कोट्यवधींचा टप्पा पार केला आहे. दरम्यान १० ते ११ दिवसात चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
उल्हासनगरमधील सिंधू एज्युकेशन सोसायटीने नुकतंच 'OMG 2'च्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी लेखक- दिग्दर्शक अमित राय यांनाही आमंत्रित केले होते. चित्रपट पाहिल्यानंतर उल्हासनगरच्या सिंधू एज्युकेशन सोसायटीने आपल्या शाळेतील अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी सिंधू एज्युकेशन सोसायटीने 'OMG 2'च्या स्पेशल स्क्रीनिंग आयोजन केले होते. यावेळी स्क्रिनिंगमध्ये १५ शाळांचे मुख्याध्यापक, १८४ शिक्षक आणि स्थानिक आमदारांना स्क्रिनिंगसाठी आमंत्रित करण्यात आले होते. सोबतच यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अमित राय यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. मुख्यधापकांसह, शिक्षकांनीही चित्रपटाचं कौतुक केलं. कौतुक केल्यानंतर उल्हासनगरमधील शाळेमध्ये लैंगिक शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
OMG 2 चे दिग्दर्शकांनी यावेळी प्रतिक्रिया दिली, “माझा चित्रपट बनवण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. मला आनंद होत आहे की, प्रेक्षकवर्ग चित्रपटाचा विषय गांभीर्याने घेत आहेत. हा एक क्षण आहे, जो मला कायमचा जपायचा आहे. मला आनंद आहे की, हा चित्रपट केवळ व्यावसायिकदृष्ट्या चांगली कामगिरी करत नाही, पण ती सुद्धा आमचा संदेश मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे समाजामध्ये आपल्या आजूबाजूला बदल घडताना दिसतोय यापेक्षा समाधानाची गोष्ट कोणती असू शकते.”
'OMG 2' च्या या स्पेशल स्क्रिनिंगला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर संस्थेकडून मोठा निर्णय घेण्यात आला असल्याचे सविस्तर वृत्त फ्री प्रेस जर्नलनं दिले आहे. संस्था आयोजकांनी या वर्षापासून त्यांच्या शालेय वेळापत्रकामध्ये लैंगिक शिक्षणाचा समावेश केला आहे. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याला प्रतिसादही दिला आहे. बॉक्स ऑफिसवर ११ ऑगस्टला 'गदर २' आणि 'OMG 2' हे दोन्ही चित्रपट एकत्र प्रदर्शित झाले होते. गदर २ ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी, OMG 2 ला प्रेक्षकांकडून खास प्रतिसाद मिळत नाही. चित्रपटाने एकूण आतापर्यंत १२०.२७ कोटींचा पल्ला गाठलाय.
शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाचा समावेश OMG-2 निर्मात्यांसाठी मोठा विजय आहे. एज्युकेशन सोसायटीला हा चित्रपट इतका भावला की त्यांनी हा चित्रपट आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला. या निर्णयावरून असं स्पष्ट होतंय की, देश आता शिक्षण पद्धतीत बदल करण्यास पूर्णपणे सज्ज झाला आहे. एकीकडे सेन्सॉर बोर्ड या चित्रपटाला ए सर्टिफिकेट देत आहे, तर दुसरीकडे समाजातील प्रत्येक घटक नि:संशयपणे चित्रपटाला पसंती दर्शवत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.