Tejaswini Lonari  Saam tv
मनोरंजन बातम्या

Tejaswini Lonari : "हलद लाविते गं..."; सरवणकरांची होणारी सून हळदीत रंगली, पाहा खास PHOTOS

Tejaswini Lonari Haldi Ceremony : मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. नुकतीच तेजस्विनीला हळद लागली आहे. हळदीचे खास फोटो पाहा.

Shreya Maskar

मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या घरी लगीनघाई पाहायला मिळत आहे.

तेजस्विनी लोणारी समाधान सरवणकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे.

तेजस्विनी लोणारीचा हळदी समारंभ थाटात पार पडला आहे.

सध्या मनोरंजन सृष्टीत लगीन घाई पाहायला मिळत आहे. अलिकडेच सूरज चव्हाण- संजना, सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी, प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड हे या तीन जोड्या लग्न बंधनात अडकल्या आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अशात आता अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या (Tejaswini Lonari) घरी लगीन घाई पाहायला मिळत आहे. लग्नाआधीच्या समारंभांना सुरुवात झाली आहे.

तेजस्विनी लोणारीचा नुकताच हळदी समारंभ थाटामाटात पार पडला आहे. राजश्री मराठीने हळदी सोहळ्याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. तेजस्विनीच्या हळदी समारंभाला जवळचे नातेवाईक, मित्र परिवार आणि कुटुंबीय पाहायला मिळाले. तेजस्विनीने हळदीसाठी खास पारंपरिक लूक केला होता. तिने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. पिवळ्या फुलांचे दागिने आणि मॅचिंग ज्वेलरीने हा लूक खूपच सुंदर दिसत होता.

तेजस्विनी लोणारी या साज-श्रृंगारामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तेजस्विनी लोणारीचे चाहते तिच्या शाही लग्न सोहळ्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तेजस्विनी हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत. तेजस्विनी लोणारी मुंबईतील राजकीय कुटुंबाची सून होणार आहे.

तेजस्विनी लोणारी आता सरवणकरांची सून होणार आहे. ती शिंदेंच्या शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar ) यांच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. समाधान सरवणकर यांना मोठा राजकीय वारसा आहे.'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून तेजस्विनी लोणारीला खूप लोकप्रियता मिळाली. ऑक्टोबर महिन्यात तेजस्विनी लोणारीने समाधान सरवणकर यांच्यासोबत साखरपुडा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

शिवाजी महाराजांना छत्रपती का संबोधलं जातं? जाणून घ्या ऐतिहासिक अर्थ

Mumbai: प्लॅटफॉर्मवर बसून पाहत होता पॉर्न व्हिडीओ, महिलेने तरुणाला धडा शिकवला; पाहा VIDEO

Vrindavan : वृंदावनला जाताय? मग या ७ ठिकाणी नक्कीच भेट द्या

Indian Railway: वंदे भारतच्या २४ फेऱ्या महाराष्ट्रातून, सर्वाधिक जाळं पुण्यात, वाचा कोणती Vande Bharat कुठून धावते?

SCROLL FOR NEXT