बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओत श्रद्धा कपूरचा रूमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत दिसत आहे.
श्रद्धा कपूर प्रेमाने राहुल मोदीला घास भरवताना दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ती रूमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत दिसत आहे. व्हिडीओमध्ये दोघांचा क्युट क्षण पाहायला मिळत आहे. व्हिडीओतील त्यांच्या केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी अलिकडेच मुंबई कॉफी फेस्टिव्हलमध्ये फूड स्टॉल्स फिरताना दिसले. तिथे त्यांनी अनेक पदार्थांचा आस्वाद घेतला. तेव्हा श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी एकत्र दिसले. श्रद्धाने मोची (एक जपानी गोड पदार्थ) राहुल मोदीला आपल्या हाताने खाऊ घातला. मोची हा पदार्थ देणाऱ्या कॅफे स्टॉलला भेट देऊन त्यांनी मोची चाखली आणि स्टॉल मालकांशी गप्पा मारल्या.
व्हायरल व्हिडीओ 'CHÉR by Chef Ruchi Parekh' यांच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. त्यांनी या व्हिडीओला खास कॅप्शन देखील दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "आम्हाला खूप आनंद झाला आहे की, मुंबई कॉफी फेस्टिव्हलमध्ये आमच्या खास पाहुण्यांपैकी श्रद्धा कपूरने आमचा जपानी पदार्थ मोची चाखला आणि तो खूप आवडला..."
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या व्हिडीओवर नेटकरी तुफान कमेंट करून श्रद्धा आणि राहुलच्या केमिस्ट्रीचे कौतुक करत आहे. त्यांच्या जोडीला भरभरून प्रेम देत आहेत. श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा पाहायला मिळते. तसेच त्यांचे अशाच भेटीचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. श्रद्धा कपूर लवकरच ईथा (Eetha) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.