Tejashri Pradhan’s New Beginning Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tejashri Pradhan: तेजश्री प्रधान सोडणार 'वीण ही दोघांतली तुटेना' मालिका? व्हिडिओ शेअर करून दिली गुड न्यूज

Tejashri Pradhan’s New Beginning: अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या वीण ही दोघांतली ही तुटेना या मालिकेत स्वानंदीच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेमधून तीने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे.

Shruti Vilas Kadam

Tejashri Pradhan’s New Beginning: अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या वीण ही दोघांतली ही तुटेना या मालिकेत स्वानंदीच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेमधून तीने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली असून, त्याअगोदर ती ‘होणार सून मी या घरची’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘अग्गबाई सासूबाई’ अशा मालिकांसोबतच ‘ती सध्या काय करते’, ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ असे चित्रपटसुद्धा झळकली आहे.

तेजश्रीने नुकतीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती कोणाशी तरी संवाद साधताना दिसत आहे आणि त्या व्हिडीओसोबत तिने #नवीन वेब सिरिज #नवीन काम असे हॅशटॅगदेखील दिले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की ती आता मालिकांव्यतिरिक्त एका वेब-सिरिजमध्ये काम करण्याच्या दिशेने आहे. मात्र, त्या वेब-सिरिजचे नाव काय आहे, ती हिंदीमध्ये आहे की मराठी आणि ती कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे या बाबतीत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, तिची चालू मालिका ‘वीण ही दोघांतली ही तुटेना’ मध्ये ती मुख्य भूमिका साकारत आहे. तिच्यासह मालिकेत सुबोध भावे हे प्रमुख पात्र साकारताना दिसत आहेत. सध्या मालिकेतील समर-स्वानंदी व रोहन-अधिरा यांच्या लग्नाच्या तयारीचे व दृश्यांचे चित्रण सुरु आहे.

असे असताना, तेजश्रीची वेब-सिरिजमधील एंट्री आणि पदार्पण प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे.तिच्या या पोस्टमुळे ती ही मालिका सोडणार आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याचसह ती मालिकेपासून नवीन माध्यमाकडे वळत आहे का? सध्याच्या भागात बदल डावलले जाणार आहेत का? यांसरख्या अनेक प्रश्नाचे उत्तर येत्या काळात चाहत्यांना समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT