तेजश्री प्रधानची नवी मालिका
तेजश्री प्रधान आणि होणार सून मी या घरची टीमचं महाCollab
होणार सून मी या घरची गाण्यावर केली हुकस्टेप
तेजश्री प्रधानची नवीन मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना' सुरु होणार आहे. या मालिकेतून तेजश्री पुन्हा एका झी मराठीवर पुनरागमन करणार आहे. दरम्यान, या मालिकेचे अनेक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता तेजश्री प्रधानला भेटायला तिच्या ६ सासू आल्या आहेत. होणार सून मी या घरची मालिकेतील जान्हवीच्या सासूबाई आल्या आहेत.
जान्हवीच्या सासूबाईंनी दिल्या तेजश्रीला टीप्स (Tejashri Pradhan Collabration with Honar Sun Mi Ya Gharchi Team)
वीण दोघांतली ही तुटेना (Vin Doghantli Hi Tutena) या मालिकेत तेजश्रीचं समर राजवाडे म्हणजेच सुबोध भावेसोबत लग्न ठरलेलं दाखवणार आहे.त्यामुळे तिला सुखी संसारासाठी शुभेच्छा आणि काही टीप्स देण्यासाठी जान्हवीच्या सासूबाई आल्या आहे.लीना भागवत, सुहिता थट्टे,सुप्रिया पाठारे आणि पोर्णिमा तळवकर तेजश्रीच्या भेटीला आल्या आहेत. या अभिनेत्रींनी होणार सून मी या घरची मालिकेत जान्हवीच्या सासूबाईंच्या भूमिका निभावल्या होत्या.
या सर्व सासूबाईंनी तिला सूखी संसारासाठी खूप शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येकीने आपआपला अनुभव सांगत काय करावे, काय नाही हे सांगितले. प्रत्येकीने सुखी संसारासाठी खास टीप्स जान्हवीला दिल्या आहेत. याचसोबत जान्हवीला आई आजींने बनवलेले खास पौष्टिक लाडूदेखील दिले आहेत.
होणार सून मी या घरची मालिकेवर हुक स्टेप करत केली रिल (Honar Sun Mi ya Gharchi Dance Video)
यानंतर जान्हवीच्या सासूबाई आणि तेजश्री प्रधानने होणार सून मी या घरची गाण्यावर हुक स्टेप केली आहे. त्यांनी हुक स्टेप करत छान रिल बनवली आहे. हा डान्स बघून तर सर्वांना जान्हवीच्या होणार सून मी या घरची या मालिकेचीच आठवण झाली. मालिकेच्या प्रमोशनसाठी हे महाCollab करण्यात आले होते. त्याचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.