Tejashree-Subodh  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tejashree-Subodh : तेजश्री प्रधान अन् सुबोध भावे छोटा पडदा गाजवायला सज्ज, 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष

Tejashree Pradhan-Subodh Bhave New Serial : तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळणार आहे. लवकरच ही जोडी नवीन मालिकेत दिसणार आहे.

Shreya Maskar

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) कायम तिच्या मालिका आणि अभिनयामुळे चर्चेत राहिली आहे. अलिकडेच तिने 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. तेव्हापासून चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहे. तेजश्रीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

तेजश्रीचे छोट्या पडद्यावर धमाकेदार कमबॅक होणार आहे. ती नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजश्री प्रधान आणि मराठी अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) यांची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुबोध भावे पोस्ट

सुबोध भावेने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना ही बातमी दिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलं की," होणार सून 'ती' ह्या घरची" तसेच "लवकरच" हे देखील त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तसेच सुबोध भावेने तेजश्री प्रधानला या पोस्टमध्ये टॅग केले आहे. त्यामुळे ही जोडी पुन्हा प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 'होणार सून मी ह्या घरची' (Honaar Soon Mee Hyaa Gharchi ) ही तेजश्री प्रधानची गाजलेली मालिका आहे.

तेजश्री प्रधान पोस्ट

दसरीकडे तेजश्री प्रधानने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यात तिने लिहिलं आहे की, "तुला पाहते रे" (Tula Pahate Re) तसेच तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "कोणाला पाहते माहीत आहे का? " असे लिहून सुबोध भावेला टॅग केले आहे. या दोन्ही पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'तुला पाहते रे' ही सुबोध भावेची गाजलेली मालिका होती.

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या आगामी मालिकेचे नाव अद्याप जाहीर झाले नाही आहे. मात्र या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे अलिकडेच 'हशटॅग तदेव लग्नम'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime News: रात्रीच्या वेळी झोपेतून उठवून ऑफिसमध्ये नेलं अन्...; आश्रम शाळेत 11 वर्षाच्या चिमुरडीसोबत अश्लील कृत्य

पुतण्यासोबत संबंध, नंतर जत्रेला नेत नवऱ्याचा काटा काढला, ८ वर्षांच्या मुलाकडून आईचा खरा चेहरा समोर

Accident : हिट अँड रनचा थरार! भरधाव कारने बहिणींना चिरडले; थोरलीचा मृत्यू, धाकटी गंभीर जखमी

CIDCO Lottery 2025: '३५ लाखांचं घरं ७५ लाखाला विकतात', सिडकोबाबत RTI मधून धक्कादायक माहिती उघड

Mahesh Manjrekar: आज शिवाजी महाराज असते तर...; महेश मांजरेकरांसह 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचे कलाकार साई चरणी नतमस्तक

SCROLL FOR NEXT