Television Show Sonpari Team's Photo Got Viral SaamTv
मनोरंजन बातम्या

'Sonpari' Recreation : चिमुकल्यांच्या आवडत्या 'सोनपरी'चा हा फोटो पाहिलात का ?

Television Show Sonpari Team's Photo Got Viral : फ्रूटी, अल्टू अंकल आणि सोनपरी पुन्हा आले एकत्र; चाहत्यांकडून होते आहे कौतुक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'सोनपरी' मालिकेत फ्रुटीची भूमिका साकारून चिमुकल्यांच्या मनात ठाण निर्माण करणारी तन्वी हेडगे (Tanvi Hedage) ही सर्वांच्या लक्षात राहिली आहे. तर तिच्या सोबत मराठमोळ्या मृणाल कुलकर्णीने सोनपरीची भूमिका साकारली होती. ही फ्रुटी आता काय करते? तिच्या सोबतचे अल्टू अंकल कुठे असतात? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडत असतात.

ही फ्रुटी म्हणजेच तन्वी हेडगे आता मोठी झाली असून २४ वर्षांनी तिने सोनपरी आणि अल्टू अंकलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. सोनपरीच्या पोस्टरवर जसा फोटो आहे. तोच फोटो आता त्यांनी २४ वर्षांनी रिक्रिएट केला आहे.

सोनपरीमध्ये फ्रुटी, तर बाजूला सोनपरी म्हणजेच मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni ) आणि अल्टू अंकल म्हणजेच अशोक लोखंडे आहेत. फ्रुटीने दोघांच्या हनुवटीवर हात ठेवला आहे. अगदी नॉस्टॅल्जिक असा हा फोटो आहे. फोटो पोस्ट करत तन्वीने तिच्या इंस्टाग्रामवर लिहिले, "सोनपरी पुनर्मिलन" तिने "#IktuBiktuJhimPatuta" हॅशटॅग जोडला.

रियुनियनच्या आधी, तन्वीने सोन परीच्या सेटवरील थ्रोबॅक फोटो शेअर केले. त्यावर '' माझ्या काही आवडत्या सोन परीच्या आठवणींना उजाळा'' असे लिहीत तन्वीने १०० व्या एपिसोड मधील फोटो शेअर केले आहे. तसेच तिने नेपाळमधील आठवणी, फुटबॉल सामना, ख्रिसमस आणि बऱ्याच आठवणी शेअर केल्या आहेत. तिने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "मला तुमचा आवडता भाग सांगा आणि मी सर्वोत्तम भाग पिन करेन." असेही तिने लिहिले आहे.

"बरेच जण मला विचारतात की..."

तन्वीने फोटो शेअर करत लिहिले, "बरेच जण मला विचारतात की तुम्ही अजूनही भेटता का, संपर्कात आहात का आणि एकत्र कधी दिसाल. आम्ही तुमची इच्छा पूर्ण केली आहे. सेटवरचे माझे पालकच आहेत हे आणि बेस्ट सहकलाकार आहेत. आठवणींना उजाळा मिळाला."

तन्वी हेगडे 'वरवरचे वधू' हे नाटक बघण्यासाठी आली होती. मृणाल कुलकर्णीचा लेक विराजसनेच हे नाटक लिहिले आणि दिग्दर्शित केले आहे. या नाटकानंतर सोनपरीचं हे रियुनयन झालं.

चाहत्यांकडून भरभरुन कमेंट्स..

तन्वीच्या या पोस्टवर चाहत्यांनीही भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. 'कमबॅक करा प्लीज', 'बचपन की यादें', 'आणखी एक सीझन घेऊन या' असं म्हणत चाहते व्यक्त झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT