Tara Sutaria  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tara Sutaria : वीर पहाडियानंतर तारा सुतारियाच्या आयुष्यात 'आशिक', डेटिंगच्या चर्चांना उधाण

Tara Sutaria Love Life : बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. वीर पहाडियानंतर अभिनेत्री बॉलिवूडच्या 'आशिकी' फेम अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Shreya Maskar

तारा सुतारियाचा वीर पहाडियासोबत ब्रेकअप

वीरनंतर तारा सुतारियाला 'आशिकी' फेम अभिनेत्याला करते डेट

सोशल मीडियावर तारा सुतारियाचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत

बॉलिवूडमध्ये सध्या एका नवीन जोडीची चर्चा पाहायला मिळत आहे. वीर पहाडियासोबत ब्रेकअपनंतर तारा सुतारिया बॉलिवूडच्या हँडसम हंकला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. हा बॉलिवूड अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून आदित्य रॉय कपूर आहे.

फिल्मफेअरच्या वृत्तानुसार, तारा सुतारिया आणि आदित्य रॉय कपूर एकमेकांना डेट करत आहेत. अलिकडेच हे जोडपे बॉलिवूडच्या विविध पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले, तेव्हापासून यांच्या विषयी सोशल मिडियावर चांगल्या चर्चा रंगल्या आहेत. चाहत्यांना या दोघांची केमिस्ट्री खूप आवडली. मात्र अद्याप दोघांकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. सध्या हे जोडपे एकत्र खूप चांगला वेळ घालवत आहे आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांच्यातील घट्ट नात्याचे संकेत दिले आहेत.

तारा नुकतीच मुंबईतील तिच्या नवीन घरात राहायला गेली आहे. तारा सुतारिया आता लवकरच यशच्या टॉक्सिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदित्य रॉय कपूर 2025 च्या शेवटी 'मेट्रो इन दिनो' या चित्रपटात झळकला. या चित्रपटात तो सारा अली खानसोबत मुख्य भूमिकेत दिसला.

तारा वीरचा ब्रेकअप

मीडिया रिपोर्टनुसार, तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांचा ब्रेकअप झाले आहे. २०२६ च्या सुरुवातीला झालेल्या एपी ढिल्लन कॉन्सर्टच्या वादानंतर लगेचच त्यांचे नाते तुटल्याचे दिसले. जरी दोघांनी त्यांच्या विभक्त होण्याबद्दल कोणतेही अधिकृत विधान केले नसले तरी, सोशल मीडियावर त्यांच्या ब्रेकअपची चर्चा पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT