Aditya Roy Kapoor : दुबईवरून आली अन्...; सलमान खाननंतर आदित्य रॉय कपूरच्या घरात घुसली अज्ञात महिला

Aditya Roy Kapoor : सलमान खाननंतर आता बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या घरी अज्ञात महिला घुसली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Aditya Roy Kapoor
Aditya Roy KapoorSAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता त्यांच्या संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आदित्य रॉय कपूरच्या घरात एक अज्ञात महिलेने प्रवेश केल्याची घटना घडली आहे. या महिलेने घरात घुसण्यासाठी आदित्यला गिफ्ट आणि कपडे आणल्याचा दावा केला. नंतर ती घरातून बाहेर जात नव्हती. तेव्हा पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. आता या महिलेला पोलीसांनी अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मीडिया रिपोर्टनुसार, आदित्य रॉय कपूरच्या मुंबईतील वांद्रे येथील घरामध्ये ही घटना घडली आहे. 26 मे ला आदित्य शूटिंगसाठी बाहेर गेला होता. तेव्हा कामवाली बाई घरात एकटी होती. संध्याकाळी 6च्या सुमारास घराची बेल वाजली. तेव्हा घरकाम करणाऱ्या बाईने दार उघडले. तेव्हा दारात एक अज्ञात महिला उभी होती. तेव्हा त्या महिलेने आदित्य रॉय कपूरच्या घरी काम करणाऱ्या बाईला विचारले की, "हे आदित्य रॉयचे घर आहे ना?" त्यानंतर तिने सांगितले की, मला आदित्य रॉय कपूरला काही गिफ्ट आणि कपडे द्यायचे आहेत. असे म्हणून ती घरात घुसली.

कामवाल्या बाईने घडलेला प्रकार आदित्यला सांगितला. मात्र अभिनेत्याने घरी आलेल्या अज्ञात महिला ओळखले नाही. त्यामुळे त्याने तिला घराबाहेर जाण्यास सांगितले. मात्र महिला घरातून जाण्यास तयारच नव्हती. त्यानंतर आदित्यने सोसायटीच्या मॅनेजरशी संपर्क साधला आणि खार पोलीस स्टेशनला तक्रार केली. आदित्य रॉय कपूरच्या घरात शिरलेल्या अज्ञात महिलेविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

अज्ञात महिला कोण?

मीडिया रिपोर्टनुसार, आदित्य रॉय कपूरच्या घरी आलेल्या अज्ञात महिलेचे नाव झकारिया सिद्दीकी असे असून ती 47 वर्षांची आहे. तसेच ती दुबईची रहिवासी आहे. आदित्य रॉय कपूरच्या घरात अज्ञात महिलेने प्रवेश केल्यामुळे त्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन त्याची सिक्युरिटी वाढवण्यात आली आहे. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत देखील घडली होती. त्याच्या घरी देखील अज्ञात महिला आणि मुलाने प्रवेश केला होता.

Aditya Roy Kapoor
Dhadak 2 : 'धडक २'ची रिलीज डेट जाहीर, सिद्धांत चतुर्वेदी-तृप्ती डिमरी करणार रोमान्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com