Tamil Musician Actor Vijay Antony Daughter End Her Life  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vijay Antony’s Daughter Dies: प्रसिद्ध तमिळ अभिनेत्याच्या मुलीची राहत्या घरी आत्महत्या, कारणंही आलं समोर...

Vijay Antony’s Daughter News: सुप्रसिद्ध तमिळ संगीतकार आणि अभिनेता विजय अँटोनीच्या मुलीने आज पहाटे आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.

Chetan Bodke

Tamil Musician Actor Vijay Antony Daughter Dies

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी येत आहे. सुप्रसिद्ध तमिळ संगीतकार, अभिनेता आणि निर्माता विजय अँटोनीच्या मुलीने आज (१९ सप्टेंबर) पहाटे आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर येताच सिनेसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे. (Tollywood)

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या मुलीने आपल्या चेन्नईतील राहत्या घरी गळफास घेतला आहे. पहाटे ३ वाजता विजय यांची मुलगी घरामध्ये मृतावस्थेत आढळली. लगेचच तिला कुटुंबीयांकडून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचाराआधीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. विजयची मुलगी चेन्नईतल्या एका प्रसिद्ध शाळेत शिक्षण घेत होती. रिपोर्ट्सनुसार, ती तणावाखाली होती आणि त्यासाठी तिच्यावर उपचार सुरू होते. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिलं आहे. (Actors)

घरातल्या मदतनीसाला अभिनेत्याची मुलगी मृतावस्थेत आढळून आली होती. तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारा आधीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. विजयच्या कुटुंबाबद्दल सांगायचे तर, पत्नी फातिमा आणि दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. विजय अँटोनी टॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्याचं स्वत: चं प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या बैठका आणि मुलाखती

महागाईची झळ बसणार! सोनं उच्चांक गाठणार, पेट्रोल - डिझेलच्या किमती वाढणार; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Year in Search 2025: रात्रीच्या वेळेस मुलींनी इंटरनेटवर सर्वाधिक काय सर्च केलं?

Jobs : राज्यात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी,३ लाख पदं रिक्त असल्याची माहिती

Dry Fruits For Skin Glow: काजू, बदाम आणि पिस्ता.. काय खाल्ल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो?

SCROLL FOR NEXT