Tamil film actor-producer Winster Vijay aka Murugan passed away  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Death: ना कोणता आजार, ना काही त्रास; साऊथ सुपरस्टारच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला धक्का

Actor Death: तामिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेता-निर्माता विन्स्टर विजय उर्फ मुरुगन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने सिनेविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Shruti Vilas Kadam

Actor Death: तामिळ चित्रपटसृष्टी आज दु:खात बुडाली आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता विन्स्टर विजय, ज्यांना तामिळ चित्रपटसृष्टी मुरुगन म्हणून ओळखत होती त्यांचे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले आहे. त्यांच्या या दु:खद निधनामुळे कुटुंब, मित्र, सहकारी आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

विन्स्टर विजय यांनी फार मोठ्या भूमिका केल्या नसल्या तरी त्यांनी छोट्या पण प्रभावी भूमिकांमुळे भारताच्या दक्षिण चित्रपटसृष्टीत स्वतःची एक ठळक ओळख निर्माण केली. त्यांनी सुरुवातीच्या काळात त्यांना मोबमध्ये काम करण्यापासून आपली कारकीर्दीची सुरू केली आणि नंतर छोट्या भूमिका त्यांना साकारयला मिळाल्या. त्यांच्या नॅचरल अभिनय नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा ठरला. विशेषतः तामिळ चित्रपट “एप्पोदु रहजा” मध्ये मुरुगनच्या भूमिकेने प्रेक्षकांचा आणि चाहत्यांचा मन जिंकलं. त्याच्या अभिनयातील गांभीर्य आणि त्यांचे डायलॉग विशेष लक्षवेधी ठरले.

गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता वाढली होती. त्यांचे चाहते काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुव श्रद्धांजली वाहत आहेत. एका चाहत्याने लिहीले, "अन्था रिअॅक्शन कुट्टम अण्णा" वी मिस यू, आणखी एका चाहत्याने लिहिले, अभिनेता/दिग्दर्शक #WinStarVijay उर्फ ​​#HMurugan यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन...

विन्स्टर विजय यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबिय, सहकारी आणि चाहते त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करत आहेत. मुरुगन यांचे अंत्यसंस्कार आज त्यांच्या परिवार आणि मित्रांच्या उपस्थितीत पार पाडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे -बंगळूरसाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन

Khaja Mithai Recipe: घरीच बनवा खमंग आणि कुरकुरीत खाजा मिठाई रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

Mumbai Local: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृत्यू, मुंलुंड रेल्वे स्थानकावर अपघाताचा थरार

Mugache Dhirde Recipe: मुगाची भाजी खाऊन कंटाळलात? मग बनवा मुगाच्या उसळीची धिरडे, वाचा पारंपारिक रेसिपी

America- Iran: मोठी बातमी! अमेरिका-इराण शांतता चर्चा अयशस्वी, इराणला अटी मान्य नाही, आता डोनाल्ड ट्र्म्प काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT