Famous Actor Arrested SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor Arrested : प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; कंपनीला घातला ५ कोटींचा गंडा, ७ वर्षांपासून होता गायब

Actor Arrested : प्रसिद्ध अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली कंपनीची फसवणूक अभिनेत्याने केली आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.

अभिनेत्याने एका कंपनीची ५ कोटींची फसवणूक केली.

अभिनेता ७ वर्षांपासून गायब होता.

मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोठ्या अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून साऊथ स्टार एस. श्रीनिवासन आहे. त्याला 'पॉवरस्टार' तमिळ चित्रपटांमुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. दिल्ली पोलिसांनी मोठ्या कर्ज फसवणुकीच्या प्रकरणात त्याला अटक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, श्रीनिवासन यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी एका कंपनीला 1000 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देऊन 5 कोटी रुपये घेतले. परंतू नंतर पैसे हडपले.

एस. श्रीनिवासनला दिल्ली पोलिसांनी चेन्नईच्या वनग्राम भागातून अटक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, श्रीनिवासनला न्यायालयाने आधीच दोनदा गुन्हेगार घोषित केले आहे. 2018 पासून एस. श्रीनिवासन (S Srinivasan) फरार होते. त्यांनी हॉटेल आणि कॉर्पोरेट गुंतवणुकीच्या नावाखाली कंपनीची फसवणूक केली. कंपनीने सांगितले की, एस. श्रीनिवासन यांनी दावा केला होता की, 5 कोटी रुपयांवर 1000 कोटींचे कर्ज मिळू शकते आणि जर कर्ज मिळाले नाही तर ते 30 दिवसांच्या आत पैसे परत करतो.

एस. श्रीनिवासन यांनी कंपनीला आपली ओळख बाबा ट्रेडिंग कंपनीचे मालक म्हणून करून दिली. त्यानंतर कंपनीने त्यांला 5 कोटी रुपये दिले. जे स्टॅम्प खरेदी करण्याच्या नावाखाली घेण्यात आले. परंतु कर्ज मिळाले नाही आणि पैसे परत केले गेले नाहीत. तपासात असे आढळून आले की, 5 कोटी रुपये बाबा ट्रेडिंग कंपनीच्या खात्यात आधी जमा केले गेले आणि नंतर श्रीनिवासन आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यात हस्तांतरित केले गेले. त्यांनी 50 लाख रुपये रोख रक्कम काढली आणि उर्वरित रक्कम मुदत ठेवीत गुंतवली.

श्रीनिवासनने स्टॅम्प प्रत्यक्षात खरेदी केल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणतेहे कागदपत्र दाखवले नाही. त्याला 2013 मध्ये अंतरिम जामीन मिळाला. ज्यात त्याने 10 कोटी परत करण्याचे आश्वासन दिले होते परंतु केवळ 3.5 लाख परत केले. यानंतर तो फरार झाला. 2016 मध्ये पहिल्यांदाच त्याला 'गुन्हेगार' घोषित करण्यात आले. 2017 मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली परंतु 1018 मध्ये पुन्हा जामीन मिळाल्यानंतर तो पुन्हा गायब झाला. चेन्नईमध्ये त्याच्याविरुद्ध आणखी 6 गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amaravati News: कुख्यात गुंडांकडून धाब्यावर ढाबाचालक आणि महिलेला मारहाण, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Dowry System : लग्नात हुंडा घेणारे नामर्द; प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांचं परखड मत

Rainfall Alert : सतर्क राहा! पुढचे ७ दिवस धो-धो कोसळणार, IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा

हाडं ठिसूळ झाली? उठता बसता कटकट आवाज येतो? ५ रूपयांचा 'हा' पदार्थ खा, स्ट्राँग हाडांचं सिक्रेट

Skin: जास्त वेळ पाण्यात राहिल्यानंतर त्वचा आकुंचन का पावते?

SCROLL FOR NEXT