सोनम कपूरचा 'रांझणा' पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
AIच्या मदतीने चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलण्यात आला आहे.
'रांझणा' चित्रपटात मुख्य भूमिकेत सोनम कपूर आणि धनुष झळकला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि साउथ अभिनेता धनुषचा (Dhanush ) गाजलेला चित्रपट 'रांझणा' आता एका वेगळ्या रंगरुपात पाहायला मिळणार आहे. 'रांझणा' (Raanjhanaa ) हा धनुषचा हिंदीतील पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आजही 'रांझणा' चित्रपटातील गाण्याचे चाहते दिवाने आहेत. तसेच 'रांझणा' पाहिल्यावर धनुष आणि सोनम कपूरच्या जोडीचे खूप कौतुक करण्यात आले. आता या चित्रपटासंबंधित मोठे अपडेट समोर आले आहे.
'रांझणा' चित्रपट 2013मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा तो हिंदी आणि तमिळ भाषेत रिलीज करण्यात आला. आता 'रांझणा'चे AI रुप पाहायला मिळणार आहे. 'रांझणा' चित्रपटाचा क्लायमॅक्स AIच्या मदतीने एडिट करण्यात (AI Generated Climax Of Raanjhanaa) आला आहे. हा चित्रपट 1 ऑगस्टला नवीन क्लायमॅक्ससोबत रिलीज होणार आहे. मात्र AI चित्रित क्लायमॅक्स असलेला 'रांझणा' चित्रपट फक्त तमिळ भाषेत पाहायला मिळणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चमत्कार पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
'रांझणा' ही एक प्रेमकथा आहे. ही बनारसमध्ये राहणारा कुंदन आणि झोयाची गोष्ट आहे. कुंदनला झोयावर लहानपणापासून प्रेम असते. पण ती शिकायला दिल्लीला जाते आणि तिथे दुसऱ्या मुलाच्या (अक्रम) प्रेमात पडते. जो पुढे मरतो आणि झोया अक्रमच्या मृत्यूला कुंदनला जबाबदार ठरते. अशा रंजक कथा आहे. 'रांझणा' चित्रपटातील गाण्यांना ए. आर. रहमान यांनी संगीत दिले आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल रॉय आहेत.
'रांझणा'चा क्लायमॅक्स बदलल्यामुळे दिग्दर्शक आनंद एल रॉय यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता 1 ऑगस्टला 'रांझणा' चित्रपट काय धुमाकूळ घालतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'रांझणा' चित्रपटाच्या AI क्लायमॅक्स विषयी सोशल मीडियावर चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. काही प्रेक्षक AI क्लायमॅक्स पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तर काही यामुळे नाराज आहेत.
'रांझणा' चित्रपट थिएटरमध्ये कधी रिलीज झाला?
21 जून 2013
'रांझणा' पुन्हा कोणत्या तारखेला प्रदर्शित होणार?
1 ऑगस्ट 2025
'रांझणा' चित्रपटाच्या री-रिलीजमध्ये काय नवीन पाहायला मिळणार?
AIच्या मदतीने एडिट केलेला चित्रपटाचा नवीन क्लायमॅक्स
'रांझणा'ची मुख्य स्टारकास्ट कोण?
धनुष-सोनम कपूर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.