सध्या तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia ) तिचा आगामी चित्रपट 'ओडेला 2' मुळे चांगलीच चर्चेत आहे. 17 एप्रिलला 'ओडेला 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. तमन्ना भाटियाचे 'स्त्री 2' मधील 'आज की रात' या आयटम साँग खूप प्रसिद्धी मिळाली आहे. आता तमन्ना भाटियाचे नवीन गाणे प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आता तमन्ना भाटिया अजय देवगण (Ajay Devgn) आणि रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) आगामी चित्रपट 'रेड 2' (Raid 2) मध्ये आयटम साँग ( Item Song ) करताना झळकणार आहे. तिचा डान्स शूटिंग दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तमन्ना भाटिया गोल्डन रंगाच्या लेहेंग्यामध्ये डान्स स्टेप करताना पाहायला मिळत आहे. व्हिडीओत तमन्नाचा स्टायलिश अंदाज दिसत आहे.
मोकळे केस, मेकअप आणि मिनीमल ज्वेलरीमध्ये तिचा लूक खुलून आला आहे. तमन्ना भाटियाचे नवीन गाणे पाहण्यासाठी चाहते खूप आतुर आहेत. मात्र अद्याप तिच्यासोबत या गाण्यामध्ये कोण पाहायला मिळणार याचा खुलासा झाला नाही. तमन्नाच्या व्हिडीओतील लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे. 'आज की रात' या गाण्यासाठी तिने जो लूक केला होता तसाच लूक तिने आता नवीन गाण्यासाठी केला आहे.
'रेड २' चित्रपटात बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण आणि रितेश देशमुख झळकणार आहे. चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत रितेश देशमुख पाहायला मिळणार आहे. 'रेड 2' चित्रपटात रितेश देशमुख दादाभाईच्या भूमिकेत आहे. अजय आणि रितेश सोबतच या चित्रपटात वाणी कपूर, सौरभ शुक्ला हे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. 'रेड 2' 1 मे 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.