TMKOC New Roshan Sodhi Name Revealed Saam Tv
मनोरंजन बातम्या

Who Is Monaz Mevawalla: जेनिफर मिस्त्रीनंतर 'रोशन भाभी'च्या भूमिकेत कोण दिसणार?; चाहत्यांना उत्सुकता

TMKOC Roshan Bhabhi New Entry: एप्रिल २०२३ मध्ये जेनिफर मिस्त्रीने मालिका सोडली होती. तिच्यानंतर मालिकेमध्ये, कोणतीही अभिनेत्री दिसली नाही. आता लवकरच मालिकेमध्ये मिसेस रोशन सिंग सोढीच्या भूमिकेत एक नवी अभिनेत्री दिसणार आहे.

Chetan Bodke

TMKOC New Roshan Sodhi Name Revealed

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका कायमच कलाकारांमुळे जोरदार चर्चेत राहते. गेल्या १५ वर्षांहून ही मालिका चाहत्यांचे निखळ मनोरंजन करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मालिकेमध्ये, दया भाभीच्या एन्ट्रीची चर्चा रंगली. पण तसं काही घडलं नाही. पण आता मालिकेमध्ये, एका वेगळ्याच पात्राची जोरदार चर्चा पाहायला मिळते. सध्या मालिकेमध्ये अनेक पात्रांचं रिप्लेसमेंट होताना दिसत आहे. एप्रिल २०२३ मध्ये जेनिफर मिस्त्रीने मालिका सोडली होती. तिच्यानंतर मालिकेमध्ये, कोणतीही अभिनेत्री दिसली नाही. आता लवकरच मालिकेमध्ये मिसेस रोशन सिंग सोढीच्या भूमिकेत एक नवी अभिनेत्री दिसणार आहे.

आता मालिकेमध्ये, मिसेस रोशन सिंह सोढीची भूमिका अभिनेत्री मोनाज मेवावाला करणार आहे. एप्रिल २०२३ पर्यंत मालिकेमध्ये मिसेस रोशन सिंह सोढीची भूमिका जेनिफर मिस्त्रीने साकारली होती. जेनिफर मिस्त्रीने काही कारणामुळे मालिका सोडली होती. सध्या मालिकेमध्ये अनेक पात्रांचे रिप्लेसमेंट पाहायला मिळत आहे. पण याचा फटका निर्मात्यांना बसत आहे. मालिकेचा टीआरपी सध्या बऱ्याच प्रमाणावर घसरलेला पाहायला मिळत आहे. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

मालिकेमध्ये, मिसेस रोशन सिंह सोढीची भूमिका अभिनेत्री मोनाज मेवावाला करणार आहे. मोनाज मेवावालाने आतापर्यंत अनेक सिरियल्समध्ये काम केलं आहे. तिचे आई- वडील दोघेही फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत. वडील फिरदौस मेवावाला तर आई आशा फिरदौस आहे. (Serial)

मोनाज मेवावाला अभिनेत्रीसोबतच साल्सा डान्सर सुद्धा आहे. तिने २००४ पासून आपल्या सिनेकारकिर्दिला सुरुवात केली आहे. तिने ‘द ग्रेट इंडियन कॉमेडी शो’, ‘मीत मिला दे रब्बा’, ‘रिश्तो की डोर’, ‘सीआयडी’, ‘एफआयआर’, ‘सावधान इंडिया’ सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

ITR Filling 2025: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर रद्द झाला तरीही पुन्हा मिळणार संधी, खात्यात जमा होणार रिफंड

HBD Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई किती कोटींचा मालक?

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT