TMKOC's Asit Modi Accused : अन्न, पाण्यासारख्या मुलभूत गोष्टींसाठी भीक मागावी लागायची... जेनिफर मिस्त्रिची तारक मेहताच्या निर्मात्यांवर पुन्हा गंभीर आरोप

TMKOC News : तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील मिसेस सोढी म्हणजेच जेनिफर मेस्त्री या मालिकेतील कलाकार आणि निर्मात्यांवर आरोप करत आहे.
Jenifer Mistry Allegation On Producer
Jenifer Mistry Allegation On ProducerSaam Tv

Jennifer Mistry Shared An Incident happened with her : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)ही मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. या मालिकेवर प्रेक्षक आजही प्रेम करतात. मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. या मालिकेतील कलाकार नेहमीच चर्चेत असतात. परंतु काही दिवसांपासून मिसेस सोढी म्हणजेच जेनिफर मेस्त्री या मालिकेतील कलाकार आणि निर्मात्यांवर आरोप करत आहे.

जेनिफरने शोचे निर्माते आणि बिझनेस हेड विरुद्ध लैगिंक शोषणाची तक्रार केली होती. आता पुन्हा जेनिफरने तिला सेटवर घाणेरडी वागणूक मिळत होती असा खुलासा केला आहे. जेनिफर मिस्त्रीने याआधी सेटवरील वर्किंग कल्चरबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यानंतर जेनिफरने नवीन आरोप केले आहे.

Jenifer Mistry Allegation On Producer
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah 15 Years Completed: ‘तारक मेहता...’ ची १५ वर्ष, ‘हसो हसाओ’ची थीम करत निर्मात्यांसह कलाकारांनी केलं सेलिब्रेशन

तर जेनिफरने पुन्हा एकदा आरोप करत तिची व्यस्था मांडली आहे. तिने प्रोडक्शन टिमवर आरोप केला आहे की, प्रॉडक्शन टीमने तिला २० दिवस न धुतलेले कपडे घालायला लावले. तब्बल २० दिवस ते लोक माझे कपडे धूत नव्हते. जेनिफरने सांगितले की, स्वतः चे कपडे ती स्वतः धुवायची. तर कपडे वाळवण्यासाठी ड्रायर वापरायची. असे काही लोक होते की ज्यांचे कपडे सेटवर धुतले जायचे.

जेनिफरने असा दावा केला आहे की, कलाकारांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टींसाठी भीक मागायला लागायची. सेटवर दररोज पिण्याच्या पाण्याच्या मोजक्याच बाटल्या असायच्या. जेव्हा कास्ट मेंबर्स काही गोष्टी मागायचे, तेव्हा त्या गोष्टी मिळायच्या नाहीत, असे आरोप जेनिफरने केले.

जेनिफर प्रोडक्शन हाउसवर आरोप करत म्हणाली की, कलाकारांना रात्रीच्या जेवणासाठी भीक मागावी लागत असे. त्यांना बिस्किटांची पाकिटेही दिली जात नव्हती. जेनिफरने खुलासा केला की, ती सेटवर स्वतःचे बूट घालायची आणि तिने मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी कपडे आणि शूजसाठी पैसे देण्यास सुरुवात केली. मुलांनादेखील कपडे मिळत नव्हते. त्यांना स्वतः च्या कपड्यांची व्यवस्था स्वतः करावी लागत होती.

जेनिफरने या वागणूकीमुळेच मालिका सोडली असल्याचा खुलासा केला आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेबद्दल बोलायचे तर, मालिकेने नुकतीच १५ वर्ष पूर्ण केली आहेत. तर मालिकेतील सुप्रसिद्ध पात्र दयाबेन म्हणजेच दिशा वकानीने ६ वर्षांपूर्वी मालिकेतून रजा घेतली होती. तर आता दयाबेन पुन्हा कमबॅक करणार असल्याची माहिती निर्माते असित कुमार मोदी यांनी दिली आहे.

Jenifer Mistry Allegation On Producer
Prajakta Mali Shared Maharashtrachi Hasyajatra Set Video: ‘...आणि अखेर शूटिंगला सुरुवात झाली’; म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केला हास्यजत्रा सेटवरील कमाल व्हिडीओ

इतकी वर्ष झाली तरी मालिकेची लोकप्रियता कमी झाली नाही. पण या मालिकेतीच पात्र मात्र प्रसिद्धीच्या शिखरावर मालिका सोडून गेले. मालिकेतील तारक मेहता, अंजली, सोनू, सोढी, मिसेस सोढी, राज अनादकाट अशा अनेक कलाकरांनी मालिका सोडली आहे. मालिका सोडल्यांनंतर यातील काही कलाकारांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com