Maharashtrachi Hasyajatra Set Video: ‘..आणि अखेर शूटिंगला सुरुवात झाली’; म्हणत प्राजक्ता माळीने शेअर केला हास्यजत्रा सेटवरील कमाल व्हिडीओ

Prajakta Mali Shared Video: टेलिव्हिजन अभिनेत्री प्राजक्ता माळीने सेटवरील व्हिडिओ शेअर करत तिने शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती दिलीय.
Prajakta Mali Shared Maharashtrachi Hasyajatra Set Video
Prajakta Mali Shared Maharashtrachi Hasyajatra Set VideoInstagram

Prajakta Mali Shared Maharashtrachi Hasyajatra Set Video:

महाराष्ट्राचं निखळ मनोरंजन करणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही मालिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. हा कॉमेडी शो काही महिन्यांच्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

येत्या १४ ऑगस्टपासून या मालिकेचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेतील सर्वच कलाकार अमेरिका दौरा संपवून पुन्हा एकदा मालिकेच्या शूटिंगसाठी सर्वच कलाकार सज्ज झाले आहेत.

नुकतेच, या शोची सुत्रसंचालक होस्ट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री प्राजक्ता माळीने सेटवरील एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने व्हिडीओ शेअर करत शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती चाहत्यांना दिलीय.

Prajakta Mali Shared Maharashtrachi Hasyajatra Set Video
IRS Sameer Wankhede: दाऊदच्या धमक्यांना अजिबात घाबरत नाही; अंडरवर्ल्डकडून येणाऱ्या धमक्यांच्या प्रश्नांवर IRS समीर वानखेडेंचे रोखठोक उत्तर

दरम्यान काल, शोची जज आणि अभिनेत्री सई ताम्हणकरने सेटवर पोहोचल्यानंतर पहिल्यांदाच तिने शोमधील स्पर्धकांसोबत संवाद साधला. तिचे ते इन्स्टाग्राम लाईव्ह सोशल मीडियावर बरेच चर्चेत आले. यावेळी तिने सेट व्हिझिट दिली असून कार्यक्रमातील सर्वच कलाकारांसोबत तिने एक-एक करुन संवाद साधला होता. पण नुकताच अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सेटवरील धम्माल मस्ती प्रेक्षकांना दाखवली. मालकेच्या सेटवरील आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणाचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे.

व्हिडीओ शेअर करताना प्राजक्ताने कॅप्शन दिले की, “आणि काल शूटिंगला सुरुवात झाली... प्रेक्षकांची आवडती हास्य थेरपी आता १४ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.” प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ‘आतुरतेने वाट पाहतोय, हास्यजत्रा आणि तुला बघण्यासाठी’ अशी एका युजरने प्रतिक्रिया दिली आहे, तर अनेक युजर्सने तिला आगामी सीझनमध्ये पाहण्यासाठी आतूर असल्याची कमेंट केली आहे. तर आणखी एक युजरने कमेंट केली, “कसलंही टेन्शन असूद्या, यातला कोणताही एपिसोड लावला की रिलीफ मिळतो” अशी प्रतिक्रिया दिली.

Prajakta Mali Shared Maharashtrachi Hasyajatra Set Video
Madhurav Boru Te Blog At Maharashtra Sadan: दिल्लीच्या तख्तावर रंगणार मराठमोळं नाटक, महाराष्ट्र सदनात होणार ‘मधुरव बोरु ते ब्लॉग’चा खास प्रयोग

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कॉमेडी शो येत्या १४ ऑगस्टपासून सोमवार ते गुरुवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com