Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam Tv
मनोरंजन बातम्या

Run Jetha Run: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' येणार नव्या रुपात, 'ही' पात्र दिसणार नव्या स्टाईलमध्ये

'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका केवळ दूरदर्शनवरच नाही तर एका नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Game: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका गेली १४ वर्षे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहे. तब्बल १३ वर्षांपासून ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. दरम्यान, अनेक कलाकारांनी मालिकेला रामराम करत काढता पाय घेतला. तरी देखील, आजही या मालिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. आता नुकतेच शोच्या निर्मात्यांनी नवीन घोषणा केली आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका केवळ दूरदर्शनवरच नाही तर एका नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा या शोच्या प्रेक्षकवर्गासाठी आनंदाची बातमी आली आहे. आता या शोचा आनंद फक्त टीव्हीवरच नाही तर गेम्सच्या माध्यमातूनही घेता येणार आहे. निर्मात्यांनी या शोवर एक कॉमेडी गेम तयार केला आहे. जो पूर्णपणे विनामूल्य आहे. विशेष म्हणजे या गेममध्ये तुमच्या आवडीचे सर्व पात्र डिजीटली पाहायला मिळणार आहेत. अलीकडेच 'तारक मेहता'च्या अधिकृत ट्विटर हँडलवरही याची घोषणा करण्यात आली होती.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा या शोमधील जेठालाल उर्फ दिलीप जोशी आणि पोपटलाल उर्फ श्याम पाठक दिसत आहेत. गेममधील सर्व पात्रे शो प्रमाणेच दिसतील. बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता ते दयाबेन उर्फ ​​दिशा वकानी देखील दिसणार आहेत.

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका ज्या पध्दतीने प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे त्याप्रमाणेच या गेममध्ये मजेदार शैली असेल. जेठालाल त्याची क्रश बबिता जीसोबत दिसणार आहे. या गेममध्ये बबिता अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये दाखवण्यात आली आहे. कार्टूनवर आधारित हे डिजीटल कॅरेक्टर्स बघायला आनंद वाटतो आहे. विशेष बाब म्हणजे हा गेम अँड्रॉईड आणि आयफोन दोन्हीमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे जर तुम्हाला या गेमचा आनंद घ्यायचा असेल,तर हा गेम गुगल प्ले किंवा अॅप स्टोअरवर मोफत डाउनलोड करू शकता. 'रन जेठा रन' असे या खेळाचे नाव आहे.

माहितीनुसार, दिशा वकानीने उर्फ दयाबेन २०१९ मध्ये काही कारणास्तव तिने या शोची रजा घेतली आहे. तेव्हापासून ती शोमध्ये परतण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शोमध्ये परतण्यासाठी निर्मात्यांनी अनेकदा तिच्याशी संपर्क साधला पण तिने नकार दिला. दिशा म्हणजेच दयाबेन शोची सर्वात लोकप्रिय आणि आवडती अभिनेत्री आहे. दयाबेनच्या भूमिकेसाठी कोणत्याही अभिनेत्रीला कास्ट केले गेले नाही आहे.

Edited By: Manansvi Choudhary

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

'ऑपरेशन लोटस'ला तडा, या माजी आमदाराच्या पक्ष प्रवेशाला विरोध, भाजप कार्यकर्तांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT