Taarak Mehta Fame Sachin Shroff Second Marriage Instagram/ @sachinshroff1
मनोरंजन बातम्या

Sachin Shroff Wedding: तारक मेहता मधल्या 'मेहता साब'ने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, टीव्ही इंडस्ट्रीतील 'या' कलाकार मंडळींची हजेरी

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका फेम टेलिव्हिजन अभिनेता सचिन श्रॉफने २५ फेब्रुवारीला दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.

Chetan Bodke

Sachin Shroff Marriage Photos: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' आणि 'गम है किसी के प्यार में' मालिका फेम टेलिव्हिजन अभिनेता सचिन श्रॉफने २५ फेब्रुवारीला दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. सचिन श्रॉफच्या लग्नात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' आणि 'गम है किसी के प्यार में'मधील अनेक कलाकारांनी लग्नात उपस्थिती लावली आहे. यावेळी टेलिव्हिजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी लग्नात उपस्थिती लावत सचिनचे अभिनंदन केले.

यावेळी सचिनचे सहकलाकार मित्र 'अंजली' (सुनयना) आणि 'बबिता' (मुनमुन दत्ता) सोबतच 'कोमल भाभी' आणि 'जेठालाल' (दिलीप जोशी) देखील नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन करण्यासाठी पोहोचले होते. यासोबतच 'गम है किसी के प्यार में' या मालिकेच्या कलाकारांनी सचिन श्रॉफचे लग्नात पोहोचून अभिनंदन केले.

Taarak Mehta Fame Sachin Shroff Second Marriage Photos

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये तारकची भूमिका साकारणाऱ्या सचिन श्रॉफच्या लग्नात शोच्या संपूर्ण कलाकारांनी हजेरी लावली होती. सर्वच कलाकारांनी जबरस्त फॅशन करत लग्नात उपस्थिती लावली होती. आतापर्यंत सचिन श्रॉफच्या घरच्यांपासून त्याच्या नववधूची ओळख लपवून ठेवली जात होती, पण लग्न आणि इतर फंक्शन्सचे फोटो समोर आल्यानंतर सचिन श्रॉफच्या पत्नीची ओळखही समोर आली आहे.

Taarak Mehta Fame Sachin Shroff Second Marriage Photos

सचिनची पत्नी चांदनी ही अभिनेत्याच्या बहिणीची मैत्रीण असून तिचा सिनेसृष्टीसोबत कोणताच संबंध नाही. चांदनी व्यवसायाने इव्हेंट मॅनेजर आणि इंटिरियर डिझायनर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

Nanded News: कुत्रा चावल्यानं म्हैस दगावली; गावकरी पडले चिंतेत, लसीसाठी हॉस्पिटलमध्ये लावली रांग, कारण काय?

Raksha Bandhan : सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट? लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार?

SCROLL FOR NEXT