Taarak Mehta Fame Sachin Shroff Second Marriage Instagram/ @sachinshroff1
मनोरंजन बातम्या

Taarak Mehta Actor Marriage: नवा तारक मेहता दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ, 'या' अभिनेत्रीसोबत झाला होता पहिला घटस्फोट

तारक मेहता फेम सचिन लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचे कळत आहे.

Chetan Bodke

Sachin Shroff Second Marriage: टेलिव्हिजन सृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय ठरणारी मालिका म्हणजे, 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. या मालिकेतील अनेक पात्रांनी मालिकेला सोडचिठ्ठी देत काढता पाय घेतला होता. या मालिकेत नेहमीच सर्वांच्या चर्चेत राहणारे म्हणजे तारक मेहता. तारक मेहता हे पात्र या मालिकेत सचिन श्रॉफ साकारत आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, सचिन लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचे कळत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सचिन श्रॉफ 25 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईत कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत विवाहबद्ध होणार आहे. त्याच्या बहिणीच्या मैत्रिणीसोबत तो लग्नगाठ बांधणार असल्याचे कळत आहे. सध्या यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे. जरीही सोशल मीडियावर बातमी वाऱ्यासारखी व्हायरल होत असली, तरीही सचिनकडून अधिकृत रित्या माहिती कळू शकलेली नाही.

सध्या मिळालेल्या माहितीनुसार, सचिनचं हे दुसरं लग्न आहे. सचिनने पहिलं लग्न 'कुमकुम' फेम प्रसिद्ध अभिनेत्री जुही परमारला सोबत केले होते. त्यांनी अनेक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले होते. त्यांना एक मुलगीही आहे. मात्र लग्नाच्या अनेक वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अद्याप सचिनने त्याच्या दुसऱ्या पत्नीची ओळख माध्यमांना सांगितली नाही. लग्नाला उपस्थित असलेल्या एका पाहुण्याने उत्साहात एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाला सर्व काही शांततेत घडावे अशी इच्छा आहे. हे अरेंज मॅरेज आहे. मात्र, सचिन श्रॉफ किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून या अभिनेत्याच्या लग्नाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

रिपोर्टनुसार, सचिन श्रॉफची दुसरी पत्नी सिनेसृष्टीतील नाही. ती व्यवसायाने इव्हेंट ऑर्गनायझर आणि इंटिरीयर डिझायनर आहे. मुख्य बाब म्हणजे, मीडिया रिपोर्टनुसार, सचिनची दुसरी पत्नी त्याच्या बहिणीची मैत्रिण असल्याचे वृत्त आहे. घरच्यांचा सल्ल्यानंतर त्याने दुसरं लग्न करण्याचा त्याने निर्णय घेतला आहे. सोबतच सचिन २५ फेब्रुवारीला कुटुंबीयांच्या उपस्थितीत सात फेरे घेणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT