Sakshi Sunil Jadhav
कामाच्या दगदगीत अनेकांना स्वत: च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसेल, तर तुम्ही चालण्याचा एक सोपा मार्ग निवडला पाहिजे.
चालणे हा संपूर्ण आरोग्यासाठी एक उत्तम व्यायाम मानला जातो. चालल्याने तुमचं वजन कमी होतं आणि आजारही कमी होतात.
चालल्याने डायबेटीज ते हार्टच्या समस्याही मोठ्या प्रमाण कमी होऊ शकतात, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. पण वेगवेगळ्या वैद्यकीय परिस्थितींसाठी चालण्याचा वेळ बदलतो.
उदाहरणार्थ, डायबेटीजच्या रुग्णाने किती वेळ चाललं पाहिजे, हृदयरोग्याने किती वेळ चाललं पाहिजे आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही किती वेळ चाललं पाहिजे? हे समजून घेणं खूप फायद्याचं ठरु शकेल. चला जाणून घेऊया.
डायबेटीजच्या रुग्णांनी दररोज १०,००० पावलं चालावे. पण दिवसातून सगल ३० मिनिटे तुम्ही चालणे फायद्याचे ठरेल.
ह्रदय निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून २०० मिनिटं वेगाने चालले पाहिजे. २०० मिनिटे म्हणजे आठवड्यातून पाच दिवस ४० मिनिटं वेगाने चालणं तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.
वजन कमी करण्यासाठी, तुम्ही दररोज ४५ मिनिटे ते १ तास वेगाने चाललं पाहिजे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी, तुम्ही इतक्या वेगाने चालावे की तुमच्या शरीराला घाम येईल.
तुम्ही दिवसाला १०,००० पावले पूर्ण केली पाहिजेत. जर किलोमीटरमध्ये पाहिले तर ५ किलोमीटर धावणे किंवा जॉगिंग केल्याने तुम्हाला वजनात काहीच दिवसात बदल झालेला पाहायला मिळेल.
ही माहिती सर्वसाधारण आरोग्य जागरूकतेसाठी देण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असू शकते.